पुणे – कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता लॉकडाऊनमधून जरी अनेक ठिकाणी शिथिलता मिळाली असली तरी नागरिक अत्यावश्यक वस्तू आणण्यासाठी घराबाहेर जाऊ शकतात. अश्यातच आता बहीण-भावाचं नातं आणखी दृढ करणारा राखीपौर्णिमेचा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’ आला आहे.
भारतात बहुतेक सर्वत्र राखीपौर्णिमा किंवा रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. हिंदू, जैन आणि कांही शिख धर्मियही हा सण आनंदाने साजरा करतात. भारतीय संस्कृतीत सणसमारंभांची मुळातच रेलचेल आहे. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही रेलचेल मंदावली आहे.
दरम्यान, रक्षाबंधनाच्या दिवशी खास दिसण्यासाठी तुम्हाला साडी लुक ट्राय करायला आवडेल का? यासाठी आम्ही काही खास बॉलिवूड फॅशन स्टाइल तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. रक्षाबंधनाला तरुणी ट्रेंडिंग पोषाख परिधान करणं पसंत करतात. पण यंदा तुम्हाला साडीमुळे बोरिंग लुक मिळेल असे वाटत असेल तर एकदा हे सेलेब्रिटी लुक नक्की पाहा…
महाराष्ट्रातील नऊवारी साडी – खणाचे ब्लाऊज जणू पारंपरिकतेचे प्रतिक आहे. ज्यामध्ये योद्धा गृहिणी आणि सौंदर्यवतीचं सौंदर्य लपलेलं आहे. तसेच राजस्थानची घाघरा साडी ही बंधेज आणि जरीबॉर्डरसह असलेली टि.व्ही. सिरीयलमधल्या कलाकारांची खास पसंती आहे.
साडीवरील नक्षीकाम- एका कार्यक्रमासाठी अभिनेत्री जान्हवी कपूरनं ही लाल रंगाची साडी नेसली होती. या साडीच्या बॉर्डरवर लाल एम्ब्रॉयडरी आणि सीक्वेंस वर्क करण्यात आलं आहे. ही साडी अतिशय स्टायलिश आहे. जान्हवीचा हा लूक प्रचंड लोकप्रिय ठरला होता.
कांजीवरम साडी – कांजीवरम साडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही साडी नेसल्यानंतर तुम्हाला वजनदार दागिन्यांची आवश्यकता भासत नाही. या साडीमुळेच तुम्हाला परफेक्ट लुक मिळतो.
तांत साडी – कॉटन साडी नेसणार्या महिलांची पहिली पसंती. ‘हॅण्डलूम’ म्हणजे मागावर विणलेली ही साडी तलम आणि सूती असते. सुंदर रंगसंगती, आकर्षित डिझाइन्समुळे या साड्या सुरेख दिसतात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा एक आकर्षक आणि सेलिब्रिटी लूक नक्की मिळेल.