Sunday, January 25, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

रक्तपेशींच्या कर्करोगावरील मौखिक डोस; टाटा मेमोरियलने केला विकसित

by
January 1, 2024
in आरोग्य वार्ता
A A
रक्तपेशींच्या कर्करोगावरील मौखिक डोस; टाटा मेमोरियलने केला विकसित
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – रक्तपेशींच्या गंभीर कर्करोगावरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या, मर्केप्टोप्यूरिनचा पहिला आणि एकमेव मौखिक डोस टाटा मेमोरियल केंद्र आणि डीएईने विकसित केला आहे. मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि नवी मुंबईतील, कर्करोग संशोधन आणि शिक्षण प्रशिक्षणाचे अत्याधुनिक केंद्र, (एसीटीआरईसी) यांनी बंगळुरूच्या आयडीआरएस लॅब्स सोबत, सहकार्य करत, देशात, मर्केप्टोप्यूरिनचा पहिला आणि एकमेव मौखिक डोस,६ – मर्केप्टोप्यूरिन (६-एमपी) विकसित केले आहे.

६-एमपी हे रक्तपेशींच्या गंभीर स्वरूपाच्या कर्करोगात, जो साधारणपणे लहान मुलांमध्ये आढळतो, त्यात किमोथेरपीचे औषध म्हणून वापरले जाते. त्यामुळे, लहान मुलांना सहजपणे घेता येईल, असं हे भुकटी स्वरूपातील मौखिक औषध, प्रीव्हल या नावाने बाजारात आले आहे.

प्रीव्हल, सहजपणे १० मिलि ग्राम/मिलि लीटरचा डोसपासून १०० मिलीचे मौखिक औषध तयार केले जाऊ शकते. प्रीव्हलसोबत एक सिरिंज आणि एक प्रेस इन बॉटल अडॅप्टर (पी. आय. बी. ए.) असते, यामुळे रुग्णाच्या शरीराच्या वजनाच्या किंवा शरीराच्या आकारमानानुसार अचूक डोस देणे शक्य होते. यामुळे सायटोटॉक्सिक संयुगांच्या संपर्कात येण्याचा धोका देखील यामुळे कमी होऊ शकतो.

प्रीव्हल विकसित होण्यामुळे, संशोधकांनी, कर्करोग उपचार प्रवासातला एक मैलाचा दगड गाठला आहे. कारण सध्या या औषधाच्या गोळ्या उपलब्ध आहेत, मात्र, त्यामुळे, अचूक मात्रा, लवचिकता, रुग्णाची सहन करण्याची क्षमता, अशी सगळी आव्हाने असतात. आतापर्यंत, मुलांमधील मात्रेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गोळी कुटून त्याची भुकटी देणे किंवा एक दिवसाआड डोस देणे अशा पद्धती अवलंबल्या जात होत्या.

प्रीव्हलला मान्यता

प्रीव्हलला भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय औषध नियामक संस्था सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडून मान्यता मिळाली आहे. या नियामक मंजुरीत, प्रीव्हलची सुरक्षितता आणि अनुपालनावर भर देण्यात आला असून, त्यामुळे आरोग्यसेवा देणारे व्यावसायिक आणि रुग्ण दोघांनाही त्याची परिणामकारकता आणि गुणवत्तेबद्दल खात्री बाळगता येईल. टाटा मेमोरियल सेंटर आणि आय. डी. आर. एस. लॅब्सने संयुक्तपणे क्लिनिकल अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित केले. अलीकडेच पीडियाट्रिक ब्लड अँड कॅन्सर या वैज्ञानिक नियतकालिकात या निष्कर्षांना नियामक मान्यता मिळाली आहे.

बाजारातील उपलब्धता

६-मरकॅप्टोप्युरिनचे ड्राय पावडरच्या स्वरूपात उपलब्ध असलेले फार्मास्युटिकल सस्पेंशन हे आयडीआरएस लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडचे पेटंट नोंदवलेले तंत्रज्ञान आहे. आयडीआरएस लॅब्सने २५ नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे फोकॉन परिषदेत प्रीव्हल या कर्करोगावरील औषधाचे अधिकृत अनावरण केले.

हे औषध डिसेंबर २०२३ च्या सुरुवातीला मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आणि लवकरच ते देशभरातील सर्व प्रमुख रुग्णालयाच्या औषधालयात उपलब्ध असेल. अॅक्युट लिंफोब्लास्टिक ल्युकेमिया या कर्करोगाच्या प्रकाराचे निदान झालेल्या १ ते १० वयोगटातील अंदाजे दहा हजार मुलांना दरवर्षी याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे.

The post रक्तपेशींच्या कर्करोगावरील मौखिक डोस; टाटा मेमोरियलने केला विकसित appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar