Holi 2024 : होळीच्या सणाला आता काही दिवस शिल्लक राहिले असून, सगळीकडे होळीची तयारी सुरु झाली आहे. यावेळी होळीचा सण सोमवार 25 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. लहान मुले असोत वा वृद्ध, प्रत्येकजण होळीच्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. ( skin care tips )
लोक आपली जुनी नाराजी- भांडण विसरून एकमेकांना गुलाल लावतात. पण होळीच्या रंगांमुळे त्वचेला इजा होण्याचा धोकाही अधिक असतो. अशा परिस्थितीत त्वचेची काळजी घेणेही तितकेच महत्वाचे असते.
होळीच्या रंगांमध्ये हानिकारक रसायने असू शकतात, ज्यामुळे त्वचेला हानी पोहोचू शकते. त्यामुळे त्वचेवर लालसरपणा, जळजळ, खाज सुटणे, मुरुम येण्याची भीती असते. ( skin care tips )
अशा परिस्थितीत जर तुम्हाला होळी खेळायची असेल तर चेहऱ्याला काही गोष्टी जरूर लावा. आज आम्ही तुम्हाला अशाच गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे तुमच्या त्वचेला नुकसान कोणतेही नुकसान होणार नाही.
खोबरेल तेल :
तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या त्वचेवर खोबरेल तेल लावू शकता. ते लावण्यापूर्वी चेहरा धुवा. त्यानंतरच चेहऱ्यावर खोबरेल तेल लावा. यामुळे त्वचेला मॉइश्चरायझेशन होते आणि रंगांवरही कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
कोरफड :
जर तुम्ही होळी खेळणार असाल तर त्याआधी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कोरफडीचे जेल लावू शकता. यामुळे रंग त्वचेला हानी पोहोचवत नाहीत. यासोबतच ते त्वचेला मॉइश्चरायझ करते. तुम्ही एलोवेरा जेलचा थर चेहऱ्यावर लावू शकता.
पेट्रोलियम जेली :
होळी खेळण्यापूर्वी तुम्ही त्वचेवर पेट्रोलियम जेली देखील लावू शकता. त्यामुळे होळीचे रंग सहज निघतील. यासोबतच त्वचेला कोरडी होण्यापासून वाचवते.
मॉइश्चरायझर :
होळी खेळण्यापूर्वी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावावे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर प्रोटेक्शन लेयर तयार होईल. यासोबतच होळीच्या रंगांमुळे त्वचेला कोणतीही हानी होणार नाही. तसेच त्वचा हायड्रेटेड राहते. याशिवाय त्वचेवर सनस्क्रीन लावा. यामुळे सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळते आणि टॅनिंगची समस्या येत नाही.
The post रंगाचा भंग व्हायला नको..! होळी खेळण्यापूर्वी आणि नंतर त्वचेची कशी घ्या काळजी; शेवटची टिप्स नक्की वाचा… appeared first on Dainik Prabhat.