या आसनाद्वारे आपण ईश्वराला शरण जात आहोत असा भाव मनात आणायचा आहे. जरी मुद्रा म्हटले आहे तरी हे आसनच आहे.
कृती : पद्मासनात बसा. दोन्ही हात शरीराजवळ बाजूला ठेवा. श्वास घ्या, दोन्ही हात बाजूने डोक्यावर न्या व हातांची नमस्कार स्थिती करा. हात पूर्ण कोपरातून सरळ ठेवा. व तळहात पूर्ण जोडा. श्वास सोडत कमरेतून पूर्ण वाका. दोन्ही हात व कपाळ जमिनीवर पूर्णपणे टेका.
कपाळ समोर टेकताना पाठीमागून सीट उचलू नका आपण ईश्वराला शरण जात आहोत असा भाव मनात आणून आपण केलेला योगाभ्यास ईश्वरचरणी अर्पण करत आहोत, असे विचार मनात आणायचे आहेत. दहा सेकंद स्थिती टिकवा. आसन सोडताना श्वास घ्या, कमरेतून सरळ होत दोन्ही हात वर उचला व डोक्यावर आणा व बाजूने खाली घ्या. शरीराजवळ बाजूला ठेवा.
लाभ : समोर वाकल्यामुळे मेंदूकडे रक्तपुरवठा होतो. दोन्ही टाचांचा ओटीपोटावर दाब आल्यामुळे आतील इंद्रियांचे कार्य सुधारते. पाठीचा कणा लवचिक राहतो.
The post योगसाधना : शरणागत मुद्रा appeared first on Dainik Prabhat.