Monday, November 17, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

येथे भक्तीचा मळा फुलतो, माणुसकीचा झराही पाझरतो – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
January 21, 2022
in लाईफस्टाईल
A A
येथे भक्तीचा मळा फुलतो, माणुसकीचा झराही पाझरतो – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आळंदी – अंलकापुरी भूमी अवघ्या महाराष्ट्राला परिचित. याना त्या कारणाने येथे दरोराज हजारो लोक येतात. अलंकापुरीत भक्‍तीचा मळा फुलतच आहे; मात्र याबरोबरच माणुसकीचा झराही पाझरताना दिसत आहे.

येथील देवकृपा सर्विस स्टेशनचे सर्वेसर्वा अमृत म्हस्के व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष व ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक प्रकाश काळे यांचा पुणे-आळंदी रस्त्यावर धाकटे पादुका येथे देवकृपा सर्विस स्टेशन या नावाने गेल्या अठरा वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेसाठी पेट्रोल पंप सुरू केला. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या समवेत याच ठिकाणाहून पंढरीकडे मार्गस्थ होते. त्यावेळी पालखीचा पहिला विसावा या ठिकाणी असतो तेथे आलेल्या सर्व भाविक भक्तांचे स्वागत तर केले जातेच; परंतु त्यांना चहा, फराळ घेतल्याशिवाय पुढे जाऊ दिले जात नाही.

तसेच परतीच्या वेळी देखील हाच उपक्रम वर्षानुवर्षे येथे राबिवला जात आहे. तसेच या पंपावर ग्राहकांसाठी सार्थ ज्ञानेश्वरी, हरिपाठ, तुळशीच्या माळा दैनंदिन डायरी व गाथा यांची पुस्तके ग्राहकांना भेट दिली जातात. त्यासाठी ऑफिसच्या बाहेर प्रथम दर्शनी फलकावर ही माहिती लावलेली दिसते. ग्राहक ऑफिसमध्ये गेल्यास त्यांचा यथोचित असा सन्मान केला जातोच त्याच बरोबर चहापान केल्याशिवाय आमच्या इथून कोणी जात नाही.

हे सारे करत असतानाच प्रकाश काळे आपल्या चारचाकीतून जाताना व येताना रस्त्यात कोणाची गाडी पेट्रोल, डीझेलशिवाय बंद पडलेली दिसली तर लगेचच आपल्या गाडीत बाटल्यांमध्ये भरून ठेवलेले इंधन त्या व्यक्तीस पुढील पंपापर्यंत पुरेल एवढे अगदी निशुल्क माणुसकीच्या नात्याने त्यांना देतात. त्यांच्या पंपावरील सर्व कर्मचारी ग्राहकांना विनम्र सेवा देत असल्याचे निदर्शनास येते. अशा पद्धतीने देवकृपा सर्विस स्टेशनचे सामाजिक कार्य सुरू आहे. ते गेली 18 वर्षापासून आजवर या पंपावर एकाही ग्राहकाने कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवली गेले नसल्याची नोंद आहे. त्यामुळे येथे अखंड भक्तीचाच मळा फुलत नाही तर, माणुसकीचा झरा अखंड वाहत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

“हे सर्व माऊलींच्या प्रेरणेतून घडते. या माऊलीच्या आदेशाने माझ्यात प्रेरणा, ऊर्जा निर्माण होते. त्यामुळेच मी हे सर्व करू शकतो. या घटनेस मी फक्त निमित्तमात्र असतो.”
-प्रकाश काळे, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar