App for book Hotel Room by hour : अनेकदा लोक दुसऱ्या शहरात फिरायला किंवा काही कामानिमित्त जातात. त्यानंतर दिवसानुसार राहण्यासाठी रूम बुक केल्या जातात. पण, कधी कधी असंही घडतं की आपल्याला एखाद्या ठिकाणी फक्त काही तास विश्रांती घ्यावी लागते आणि पुढे जावे लागते किंवा फ्रेश होण्यासाठी काही तास लागतात. असे असतानाही दिवसभराचे भाडे भरावे लागते. पण चांगली गोष्ट म्हणजे असे ॲप आता बाजारात उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुम्ही काही तासांसाठी रूम भाड्याने घेऊ शकता. | App for book Hotel Room by hour
बहुतेक लोक कुठेही बाहेर गेल्यावर स्वस्त रूम विकत घेण्यासाठी Oyo ची मदत घेतात. मात्र, आता Hourly Rooms नावाचे ॲपही बाजारात उपलब्ध झाले आहे. याद्वारे ग्राहक 3, 6, 9 आणि 12 तासांसाठी रूम बुक करू शकतात. ॲप व्यतिरिक्त, हे प्लॅटफॉर्म वेबसाइटच्या रूपात देखील उपलब्ध आहे. | App for book Hotel Room by hour
भाडे किती असते ?
हा प्लॅटफॉर्म इकॉनॉमी बजेट आणि प्रीमियम श्रेणींमध्ये हॉटेल्स ऑफर करतो. याशिवाय ग्राहक कपल फ्रेंडली, डिवोटी स्पेशल, ट्रॅव्हलर्स अड्डा यांसारखे फिल्टर देखील निवडू शकतात. प्राईजबाबत बोलायचे झाले तर हेसर्वसामान्यांना परवडेबल आहे. सीजन आणि वेळेनुसार याचे दर कमीजास्त देखील होतात. यावर दिल्लीमध्ये 3 तासांसाठी दर तपासले. तेव्हा सुरुवातीची तीन तासांची किंमत सुमारे 600 रुपये आहे.तसेच यामध्ये अधिक महाग देखील रूम्स उपलब्ध आहेत.
फिल्टरमध्ये ग्राहकांना 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, 4 स्टार आणि 5 स्टार हॉटेल्सचे पर्याय मिळतील. याशिवाय, सुविधेसाठी बरेच फिल्टर देखील आहेत. भारतातील 100 हून अधिक शहरांमध्ये त्याची सेवा उपलब्ध आहे. ज्यामध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, दिल्ली, रायपूर, आग्रा, राजस्थान, पुणे आणि मनाली या शहरांचा समावेश असल्याचे समजते. | App for book Hotel Room by hour
The post ‘या’ ॲपवरून बुक करू शकता तासांच्या हिशोबाने Hotel Room.. ट्रेकर्स.. ट्रॅव्हलर्सला होतोय फायदा appeared first on Dainik Prabhat.