मुंबई – उन्हाळ्यातील सुपरफूड समजले जाणारे टरबूज खूपच अप्रतिम आणि ताजेतवाने आहे. टरबूजमध्ये भरपूर पाणी असते, जे तुम्हाला निरोगी बनवते. तसेच डिहायड्रेशनसारख्या समस्यांवर टरबूज खूप गुणकारी आहे. तज्ञांच्या मते, एका दिवसात सुमारे 300 ग्रॅम टरबूज सेवन केले पाहिजे, परंतु तुम्हाला माहित आहे का ? टरबूज प्रत्येकासाठी फायदेशीर नाही. चला जाणून घेऊया कोणत्या समस्या असलेल्या लोकांनी टरबूजाचे सेवन करू नये.
– मधुमेह
मधुमेहाची समस्या असणाऱ्यांनी टरबूज खाऊ नये. कारण टरबूजमध्ये पाण्याबरोरबरच नैसर्गिक साखरही मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे मधुमेहींनी कोणत्याही स्वरूपात टरबूज खाऊ नये.
– किडनीचे आजार
किडनीचे आजार असलेल्या रुग्णांनी टरबूज खाऊ नये, कारण टरबूजमध्ये असलेले खनिजे किडनी खराब होण्याचा धोका वाढवतात. तज्ज्ञांच्या मते, टरबूजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. किडनीच्या आजाराचे अनेक रुग्ण असेही आहेत ज्यांच्या शरीरात लघवीही होत नाही, अशा स्थितीत टरबूजमध्ये असलेले पाणी लघवीमध्ये बदलू शकत नाही आणि अशा परिस्थितीत हृदयक्रिया बंद पडण्याची शक्यता वाढते.
– दमा
दमाच्या रुग्णांनीही टरबूजाचे सेवन टाळावे. टरबूजमध्ये भरपूर पाणी असते आणि त्याचा थंड प्रभाव असतो, त्यामुळे अस्थमाच्या रुग्णांना या फळाचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. तज्ज्ञांच्या मते, टरबूजमध्ये अमीनो अॅसिड आढळतात, ज्यामुळे अस्थमाची समस्या असलेल्या लोकांच्या समस्या वाढू शकतात.