पुणे – टेस्ट अचूकपणे पॉझिटीव्ह (HIV positive) असेल तर त्याचा अर्थ एचआयव्हीसंसर्ग (HIV positive) निश्चितपणे झाला आहे. पण याचा अर्थ एडस झाला आहे असा होत नाही. एचआयव्ही (HIV positive) बाधीत माणसाला एडस होण्यासाठी काही ठराविक महिने किंवा ठराविक काळ लागतो.
पॉझिटीव्ह (HIV positive) टेस्टची शंका असेल तर आता आणखी बऱ्याच टेस्ट करता येतात ज्यामुळे अचूक निदान करता येते. उदा. रक्तामध्ये व्हायरस आहे की नाही हे बघण्यासाठी कल्चर केले जाते. ही टेस्ट मात्र अचूक असते. याच्या उलट, टेस्ट निगेटीव्ह आली म्हणजे व्हायरस संसर्ग झालाच नाही असे समजण्याचे कारण नाही. शरीरात अँटीबॉडीज तयार व्हायला चार ते बारा आठवडे लागतात.
कधीकधी संसर्ग झाल्यानंतरही सहा महिने लागतात. एडस (HIV positive) कोणालाही होऊ शकतो. माणसांच्या बाबतीत एडस पक्षपात करीत नाही. तो माणसाची जात धर्म देश स्त्री पुरुष काहीही बघत नाही. तुम्ही कोण आहात याला महत्व नाही. तुम्ही कोणती ”चूक” केली याला जास्त महत्व आहे.
एडस याचा अर्थ ऍक्वायर्ड इम्युनेडेफिशियन्सी सिंड्रोम. हा ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसच्या संसर्गामुळे होतो. शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते. आता एडसवर बरीच प्रभावी औषधे निघाली आहेत.
शरीरामध्ये व्हायरसचा शिरकाव खालील कारणांमुळे होतो :
एचआयव्ही (HIV positive) व्हायरस शरीरात शिरकाव करण्याची अनेक कारणे आहेत. सर्वसामान्यपणे या कारणांचा बहुतेकजण गंभीरपणे विचार करताना दिसत नाहीत.
यापैकी काही महत्त्वाची ठळक कारणे आहेत जी प्राथमिक माहिती म्हणून माहित असणे आवश्यक आहे. पुरुषाचा पुरुषाशी किंवा स्त्री चा स्त्री शी लैंगिक संबंध असेल तर स्त्री चा अनेक पुरुषांशी किंवा पुरूषाचा अनेक स्त्रीयांशी लैंगिक संबंध असेल.
तर एचआयव्ही (HIV positive) बाधीत रुग्णाचे रक्त शरीरात घेतले असेल तरगरोदर स्त्री ला एचआयव्ही (HIV positive) असेल तर होणाऱ्या बाळाला एचआयव्ही होण्याचा धोका असतो.
एचआयव्हीबाधीत रुग्णाने वापरलेली सूई किंवा सिरींज दुसऱ्याने वापरली तर त्याला एचआयव्ही (HIV positive) होऊ शकतो.