Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

‘या’ पेयांच्या सेवनाने बेली फॅट घटेल अगदी सहज ! – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
July 9, 2022
in लाईफस्टाईल
A A
‘या’ पेयांच्या सेवनाने बेली फॅट घटेल अगदी सहज ! – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

बेली फॅट म्हणजे पोटावर वाढलेली चरबी केवळ तुमचा लूकच खराब करत नाही, तर त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक नुकसानही होऊ शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पोटाची चरबी म्हणजे तुमच्या आतड्यांमधली चरबी जमा होणे, जे टाइप-2 मधुमेह, हृदयविकार आणि इतर अनेक आरोग्य समस्यांसाठी कारणीभूत आहे. असा गंभीर धोका लक्षात घेऊन सर्वांनी शरीरावर साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. विशेषत: जर तुमचे पोट वाढू लागले असेल तर सुरुवातीलाच त्यावर नियंत्रण ठेवण्याचे उपाय करा.

आरोग्य तज्ञ सांगतात की लोक पोटाची चरबी कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. औषधांच्या वापरापासून ते आहारातील बदलांपर्यंत यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण तुम्हाला माहित आहे का की काही साधी घरगुती पेये तुमच्यासाठी ही समस्या कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात?

या पेयांच्या नियमित सेवनाने, जीवनशैली योग्य ठेवून तुम्ही शरीरातील अतिरिक्त चरबी सहज कमी करू शकता. जर तुम्ही देखील सपाट पोट मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर चला, अशा पेयांबद्दल जाणून घ्या ज्यांचे नियमित सेवन तुम्हाला यामध्ये मदत करू शकते.

-पुरेसे पाणी पीत रहा
दिवसभरात भरपूर पाणी पिण्याची सवय तुमच्यासाठी विशेषतः फायदेशीर मानली जाते. जर तुम्हाला शरीराचे एकूण वजन किंवा पोटावरील चरबी कमी करायची असेल तर भरपूर पाणी पिण्याची सवय लावून तुम्ही याचा फायदा मिळवू शकता. ओबेसिटी जर्नल (सिल्व्हर स्प्रिंग) मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की ज्या सहभागींनी कमी-कॅलरी आहाराचे पालन करत दिवसभरात 4-5 लिटर पाणी वापरले, त्यांचे वजन कमी होण्याची शक्यता इतरांपेक्षा 40 टक्के जास्त होती.

-कॅफिनचे सेवन देखील महत्त्वाचे आहे
कॅफीनचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक मानले जात असले तरी, काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की कॅफीन पोटाची चरबी कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. क्लिनिकल फिजियोलॉजिकल अँड फंक्शनल इमेजिंग जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात, तज्ञांना आढळले की कॅफीन चयापचय उत्तेजित करण्यास मदत करते, ज्यामुळे चरबी जाळणे सोपे होते. अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला की ज्या सहभागींनी मध्यम प्रमाणात कॅफिनचे सेवन केले त्यांचे वजन वाढण्याची शक्यता कमी आढळली.

-ग्रीन टी पिण्याचे फायदे
हिरव्या चहाचा अर्थात ग्रीन टीचा वापर त्याच्या आश्चर्यकारक आरोग्य फायद्यांसाठी वर्षानुवर्षे केला जातो. ग्रीन टी प्यायल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. त्यात कॅटेचिन नावाचे विशेष अँटीऑक्सिडंट असते जे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. कॅनेडियन फार्मास्युटिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे आढळून आले की जे सहभागी नियमितपणे ग्रीन टीचे सेवन करतात त्यांचे वजन कमी होण्याचे प्रमाण इतर लोकांपेक्षा जास्त होते.

– गरम पाण्यात लिंबाचा रस
पोटावरील चरबीपासून मुक्त होण्यासाठी सकाळी कोमट पाण्यात लिंबू मिसळून सेवन करणे खूप प्रभावी ठरू शकते. शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासोबतच कॅलरी बर्न करण्यासाठीही हे खूप उपयुक्त मानले जाते. आरोग्य तज्ञ देखील लिंबूपाणी पिणे पचनासाठी खूप फायदेशीर मानतात. याचे नियमितपणे रिकाम्या पोटी सेवन करण्याची सवय लावा.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar