मुंबई – जसजसे हवामान बदलते तसतसे आपल्याला आपल्या खाण्याच्या सवयी बदलण्याचा सल्ला देखील दिला जातो. यासोबतच काही आरोग्यदायी पेये घेण्यावरही भर दिला जातो. हेल्दी ड्रिंक्स प्रत्येक वेळी फक्त थंडच नसतात तर गरम देखील असू शकतात. अशाच 5 हॉट ड्रिंक्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत, जे प्यायल्याने केवळ रोगप्रतिकारशक्ती मजबूत होत नाही तर त्वचा चमकदार आणि निरोगी दिसते.
मसाला दूध: दुधाचे हे पेय तुम्ही नक्की ट्राय करावे. त्यात केवळ मसाल्यांचाच नव्हे तर सुक्या मेव्याचाही समावेश असावा. यासाठी तुम्ही सुक्या मेव्याचे मिश्रण अगोदरच तयार करून भविष्यातील वापरासाठी साठवून ठेवू शकता.मसाला दूध हे शरीरासाठी कोणत्याही वेळी फायदेशीर ठरते.
ग्रीन टी: ग्रीन टी त्याच्या अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. हे स्किनवरील डागांसाठी तसेच वृद्धत्वाच्या परिणामांचा सामना करण्यास देखील मदत करू शकते. त्यामुळे जर तुम्हाला तरुण दिसायचे असेल तर तुमच्या दिवसाची सुरुवात या चहाच्या कपाने करा. या चहाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील उपयुक्त आहे.
मसाला पाणी: दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारे अनेक मसाले पाण्यात उकळून साधे पेय तयार करता येते. हे त्वचेसाठी दर्जेदार काम करू शकतात. यामध्ये बडीशेप पाणी. याशिवाय, हळद, मेथी दाणे, दालचिनी, जिरे इत्यादींचा समावेश केला जाऊ शकतो. जे चमकणारी त्वचा देण्यासोबत रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. यासोबतच हे प्यायल्याने पचन देखील सुधारते.
हर्बल टी: पेपरमिंट, डेंडिलियन आणि गुलाबापासून बनवलेले हर्बल टी देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. याशिवाय हे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा आतून निरोगी राहू शकते.
हळदीचे दूध: फक्त हळदीचे पाणीच नाही तर हळदीचे दूध हे एक अद्भुत आणि चमत्कारी पेय आहे ज्याचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता. हा जादुई मसाला प्राचीन काळापासून त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. हळदीचे दूध हे एक लोकप्रिय देसी पेय आहे, जे त्वचेची काळजी घेण्यास देखील मदत करू शकते. आजारपणातही ते प्यायले जाऊ शकते.
The post ‘या’ पाच हॉट ड्रिंक्समुळे इम्युनिटी वाढेल ! स्किनच्या समस्या दूर होऊन होतील कित्येक फायदे.. appeared first on Dainik Prabhat.