मुंबई – अनेकदा आपण सुट्ट्या घालवण्यासाठी विदेशात जाण्याचा विचार करतो परंतु ट्रॅव्हलिंग आणि इतर खर्चाचे बजेट पाहता प्रत्येक वेळेला ते शक्य होत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की असे अनेक देश आहेत जिथे भारतीय रुपयाचे मूल्य खूप जास्त आहे? अशा ठिकाणी फिरायला जाऊन तुम्ही तुमच्या सुट्ट्या आंनदात घालवू शकता आणि विविध गोष्टींचा आनंद घेऊ शकता.
व्हिएतनाम – या देशात तुम्हाला भारतीय रुपयाचे राज्य असल्यासारखे वाटेल. हे ठिकाण एखाद्या गोष्टीतील कथेप्रमाणे असल्यासारखे तुम्हाला वाटते, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. येथे भारतीय रुपया चांगलाच मजबूत आहे. येथे एक भारतीय रुपया अंदाजे 338.35 डोंग इतका आहे.
कंबोडिया: या देशाला मोठा इतिहास आहे भारतीय लोकांना फिरण्यासाठी ही एक चांगली जागा आहे. येथील ऐतिहासिक वारसा असलेली ठिकाणे,हिरवीगार जंगले सर्वांना आकर्षित करतात. तसेच ही ठिकाण अगदी परवडणारे आहे. कंबोडियाचे 63.93 रिएल हे भारताच्या 1 रुपयाच्या बरोबरीचे आहे.
झिम्बाब्वे: झिम्बाब्वे हा भेट देण्यासाठी एक अद्भुत देश आहे. येथे एक रुपया 5.85 झिम्बाब्वे डॉलरला येतो, त्यामुळे तुम्ही आलिशान निवास, भोजन आणि विदेशी सफरीचा आनंद घेऊ शकता.
आइसलँड: आइसलँडची भूमी ही सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. येथे भारतीय रुपया तुम्हाला श्रीमंत वाटू शकतो. येथे भारतीय रुपया 1.87 आइसलँडिक क्रोन च्या बरोबरीचा आहे.त्यामुळे तुम्ही याठिकाणी आनंदात वेळ घालवू शकता.