error: Content is protected !!
मुंबई – ॲमेझॉनने अखेर त्यांच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2022 सेलची तारीख जाहीर केली आहे. हा Amazon सेल याच महिन्यात सुरू होणार आहे. विशेष म्हणजे हा सेल कधी संपणार याची तारीख कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही. मागील वर्षांप्रमाणे यंदाही 24 ऑक्टोबरला होणाऱ्या दिवाळीपर्यंत विक्री सुरू राहण्याची शक्यता आहे. अॅमेझॉनने विक्रीसाठी एक मायक्रोसाइट तयार केली आहे, जी या सेलदरम्यान उपलब्ध होणाऱ्या ऑफरची झलक देते.
अॅमेझॉन सेलमध्ये लॅपटॉप, स्मार्टफोन, स्मार्टवॉच, कॉम्प्युटर पेरिफेरल्स, स्मार्ट गॅझेट्स आणि अॅमेझॉन डिव्हाइसेससह विविध गोष्टींवर सवलत आणि ऑफर मिळतील. फ्लिपकार्टने अद्याप बिग बिलियन डेज 2022 सेलची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे अमेझॉनच्या हा ग्रेट सेल येत्या 23 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
एसबीआय धारकांना मोठी सूट
Amazon ने SBI सोबत भागीदारी केली आहे. SBI क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरून तुम्ही 10 टक्क्यांपर्यंत झटपट सूट मिळवू शकता. या प्लॅटफॉर्मवरून पहिल्यांदा खरेदी करणाऱ्यांना फ्लॅट 10 टक्के कॅशबॅक मिळेल. प्राइम सदस्यांना विक्रीदरम्यान उपलब्ध डील आणि सवलतींमध्ये लवकर प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.
कशा असतील ऑफर
error: Content is protected !!
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar