Saturday, December 6, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

“या’ कारणांमुळे इलेक्ट्रिक स्कूटरला लागते आग, इलेक्ट्रिक टू-व्हीलर घेण्यापूर्वी “ही’ महत्त्वाची गोष्ट समजून घ्या

by प्रभात वृत्तसेवा
May 3, 2022
in लाईफस्टाईल
A A
“या’ कारणांमुळे इलेक्ट्रिक स्कूटरला लागते आग, इलेक्ट्रिक टू-व्हीलर घेण्यापूर्वी “ही’ महत्त्वाची गोष्ट समजून घ्या
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवी दिल्ली – उन्हाळा वाढला तेव्हापासून इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत, त्यात ओला, ओकिनावा इत्यादी इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादकांची नावे आहेत. ई-स्कूटरला आग लागण्याच्या घटनांमुळे लोकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांबद्दल अविश्वास निर्माण झाला आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनात आग का लागते हे सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही वेळीच सावध व्हाल.

यामुळे लागते आग –

इलेक्ट्रिक वाहनाला आग लागण्यामागे अनेक कारणे आहेत. ई-स्कूटरमध्ये वापरलेले गॅसोलीन आणि लिथियम दोन्ही अत्यंत ज्वलनशील असतात. 210 °C पेक्षा जास्त तापमानात गॅसोलीन पेट घेते, तर लिथियम 135 °C पेक्षा जास्त तापमानात पेट घेते.

तापमान वाढीमुळे आगीच्या घटना –

आजकाल बाहेरचे तापमान शिखरावर आहे, जे इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याचे मुख्य कारण असू शकते. कमाल तापमानामुळे बॅटरी जास्त गरम होते ज्यामुळे आगीच्या घटना घडतात. मात्र, वाहनांना आग लागण्याचे कारण बीएमएस (बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम), ओव्हरचार्जिंग, चुकीच्या चार्जरचा वापर आदी कारणे असू शकतात, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

ओव्हरचार्जिंग किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागते-

अत्यंत उष्ण हवामान आणि बॅटरीची चुकीची थर्मल मॅनेजमेंट सिस्टम बॅटरीच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम करू शकते. बॅटरीला आग सामान्यतः जास्त चार्जिंगमुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे होते.

सरकारी कृती योजना

इलेक्ट्रिक वाहनातील आगीबाबत सरकार अत्यंत कठोर आहे. या प्रकरणाच्या वाढत्या घटनांदरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरकार चूक करणाऱ्या कंपन्यांवर आवश्यक ती कारवाई करेल.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar