Saturday, October 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

या काढ्यामुळे पावसाळी आजारांपासून होईल बचाव – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
June 26, 2022
in आरोग्य वार्ता
A A
या काढ्यामुळे पावसाळी आजारांपासून होईल बचाव – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी पावसाळी हंगाम हा गंभीर समस्या निर्माण करू शकतो. अशा परिस्थितीत, सर्व लोकांनी आपल्या दैनंदिन आहारात अशा गोष्टींचा समावेश करावा, ज्यामुळे पावसाळ्यातील आजारांपासून संरक्षण मिळेल. पावसाळी समस्या दूर करण्यासाठी काढ्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अशा काढ्यांबद्दल जाणून घेऊया, जे पावसाळी आजारांपासून बचाव करून रोग प्रतिकारशक्‍ती मजबूत करण्यात मदत करू शकतात.

तुळस आणि हळदीचा सर्वात फायदेशीर काढा
आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, तुळशी आणि हळद ही दोन सर्वात उपयुक्त आणि प्रभावी औषधे आहेत जी पावसाळी रोगांपासून संरक्षण देतात. या औषधांपासून बनवलेला काढा केवळ शरीराला सर्व प्रकारच्या संसर्गापासून सुरक्षित ठेवू शकत नाही, तर रोग प्रतिकारशक्तीसाठीदेखील हे खूप फायदेशीर मानले जाते.

तुळशी आणि हळदीचा काढा कसा बनवायचा?
तुळस आणि हळदीचा काढा बनवण्यासाठी प्रथम एका पातेल्यात एक ग्लास पाणी गरम करा. आता त्यात अर्धा चमचा हळद, 8-12 तुळशीची पाने, 2 टेबलस्पून मध, 3-4 लवंगा आणि थोडे दालचिनी घाला. मिश्रण 15 मिनिटे उकळू द्या. आता हे मिश्रण गाळून घ्या. चव वाढवण्यासाठी तुम्ही थोडे मध घालू शकता. रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आणि मान्सूनच्या सर्व आजारांशी लढण्यासाठी शरीराला बळकट करण्यासाठी दिवसातून एकदा या कढ्याचे सेवन करा.

अनेक रोगांमध्ये फायदेशीर काढा
आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, सर्व औषधांच्या मिश्रणातून बनवलेले हे पेय अनेक रोगांच्या प्रतिबंधात फायदेशीर ठरू शकते. मधुमेहाचे रुग्ण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी हे पेय घेऊ शकतात. तुळशी आणि हळदीचे औषधी गुणधर्म शरीराचे विष कमी करण्यास आणि रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करू शकतात. त्यामुळे हा काढा जरूर प्या. हे बद्धकोष्ठता आणि अतिसार सारख्या समस्या देखील बरे करू शकते. एवढेच नाही तर बदलत्या हवामानामुळे सर्दी आणि घसा खवखव्यातून आराम मिळवण्यासाठी या काढ्याला प्रभावी मानले जाते.

काढा सेवन करण्याचे फायदे
तज्ज्ञांच्या मते, काढ्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यात विविध औषधी वनस्पती आणि मसाले आहेत जे नैसर्गिकरित्या अँटीऑक्‍सिडंट्‌ससमृद्ध आहेत, यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते कमकुवत रोग प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना विषाणूचा संसर्ग होण्याची अधिक शक्‍यता असते, अशा स्थितीत काढ्याचा वापर रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि संरक्षण देण्यात मदत करू शकतो. अनेक संशोधनात हा काढा फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ या काढ्याची रोगप्रतिकार शक्‍ती वाढवण्यासाठी शिफारस करतात. तथापि, या काढ्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे शरीरासाठी अनेक प्रकारे हानिकारक ठरू शकते. त्यामुळे प्रमाणाची काळजी घ्या तसेच आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ला अवश्‍य घ्या.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar