Valentines Day : फेब्रुवारी महिना हा प्रियकरांसाठी खूप खास असतो. कारण ‘व्हॅलेंटाईन-डे’ या महिन्यात येतो, ज्यामध्ये जोडीदार एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपल्या मैत्रिणीला गिफ्ट देणं सोपं असलं तरी मुलींना आपल्या बॉयफ्रेंडला गिफ्ट देताना खूप विचार करावा लागतो. या व्हॅलेंटाईन डेला तुमच्या प्रियकराला कोणती भेटवस्तू द्यायची याबाबत तुम्हीही गोंधळात असाल तर आम्ही तुम्हाला काही खास गिफ्ट बद्दल सांगणार आहोत….
व्हॅलेंटाईन डे साठी तुमच्या प्रियकराला ‘हे’ गिफ्ट द्या !
वॉलेट –
बॉयफ्रेंडला गिफ्ट करण्यासाठी वॉलेट हा सर्वोत्तम पर्याय आहे कारण तो मुलांच्या रोजच्या वापरात असतो. वॉलेट नेहमी ते त्यांच्यासोबत ठेवतील आणि जेव्हा ते तुम्ही दिलेले पाकीट वापरतील तेव्हा ते तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवतील.
सनग्लासेस –
मुलांनाही सनग्लासेस खूप आवडतात. यामुळे ते मस्त दिसतात. जर तुम्हालाही व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुमच्या प्रियकराला गिफ्ट द्यायचे असेल तर त्याला सनग्लासेस नक्की द्या. त्यांना तुमची ही भेट नक्कीच आवडेल.
शूज –
मुलांना शू कलेक्शन खूप आवडतं. ते नेहमी चांगल्या शूजकडे आकर्षित होतात. अशा परिस्थितीत या व्हॅलेंटाईनला तुम्ही त्यांना शूजची चांगली जोडीही देऊ शकता. ते घातल्यानंतर तुम्हाला नक्कीच आठवतील.
स्मार्ट घड्याळ –
या व्हॅलेंटाईनला तुम्ही तुमच्या प्रियकराला एक स्मार्ट घड्याळही भेट देऊ शकता. त्यांना ही भेट खूप आवडेल. सध्या बाजारात खूप चांगली स्मार्ट घड्याळे पाहायला मिळत आहेत. तुम्ही ते ऑफलाइन किंवा ऑनलाइन खरेदी करू शकता.
ब्लूटूथ स्पीकर –
जर तुमच्या जोडीदाराला गाणी ऐकण्याची खूप आवड असेल तर तुम्ही त्याला चांगल्या कंपनीचे ब्लूटूथ स्पीकरही देऊ शकता. त्याला तुमची ही भेट खूप आवडेल. तुम्ही कधी-कधी स्पीकरवर गाणी ऐकत त्यांच्यासोबत वेळ घालवू शकता.
The post यंदा ‘Valentines Day’ला जोडीदाराला खास सरप्राईज द्यायचंय? तर ‘ही’ स्पेशल बातमी आताच वाचा…. appeared first on Dainik Prabhat.