Ganesh Chaturthi Modak – अवघ्या काही दिवसांतच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. मात्र गणपतीचा सर्वात आवडचा पदार्थ म्हणजे मोदक. उकडीच्या मोदकासह विविध मोदकांचे प्रकार आहेत. जे अनेकांच्या आवडीचे आहेत. यातील पाच मोदकांचे प्रकार पाहुयात. जे तुम्ही तुमच्या घरी विविध प्रकारचे मोदकं बाप्पासाठी नैवेद्य म्हणून तयार करू शकता.
1. खव्याचे मोदक
सर्वत्र खव्याचा मोदक मिळणार पदार्थ आहे. हलवाई दरवर्षी यामध्ये विविध चवीसह घेऊन येतात. हाच मोदक घरी करताना खव्यात साखर, केशर घालून, भाजून साच्यात घालून मोदक करतात. याची चवही अप्रतिम असते.
2 . मिक्स मोदक
या मोदकाच्या प्रकारापासून तुम्ही बाप्पालाही वेगवेगळ्या पद्धतीची चव चाखवू शकता. यासाठी पनीर, खवा, साखर, केशर, वेलची एकत्र मिक्सरमध्ये वाटून याचे मोदक साच्यामध्ये बनवून वाफवून घ्यावे लागते. वाफवलेले हे मोदक आरोग्यासाठी देखील चांगले असतात.
3. तांदळाचे गुलकंदी मोदक
प्रथम तांदुळाची उकड काढून त्यात गुलाब पाकळ्या किंवा गुलाब जल टाकावे. त्यानंतर उकडीमध्ये गुलकंदाचे सारण भरून हे मोदक मंद आचेवर तळून किंवा वाफवून घ्यावेत.
4. चॉकलेट मोदक
खवा, खोबरे, दाणे बारीक करून मळून त्याला मोदकाचा आकार द्यावा. एकेका मोदकाला हॉट चॉकलेट सॉसमध्ये बुडवून थंड करून फ्रीजमध्ये ठेवा. चॉकलेट मोदक खास करून बच्चे कंपनीच्या अधिक आवडीचा पदार्थ आहे.
5. पंचखाद्याचे मोदक
पंचखाद्य म्हणजेच खारीक, खसखस, बदाम, काजू आणि साखर एकत्र करून सारण मैद्याच्या पारीत भरून डीप फ्राय करा. यात अंजीर किंवा खजुराची पेस्टही घालता येईल. हे मोदक अतिशय सुंदर लागतात. हे मोदक पौष्टिकही असतात.
The post यंदाच्या गणेशोत्सवात ‘या’ पाच पद्धतीचे मोदक नक्की ट्राय करा appeared first on Dainik Prabhat.