Tuesday, June 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

यंदाचा गुढीपाडवा साजरा होणार ‘खण इन फॅशन’ने; पारंपरिक खणाचा पुन्हा नव्याने ट्रेंड – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
March 31, 2022
in लाईफस्टाईल
A A
यंदाचा गुढीपाडवा साजरा होणार ‘खण इन फॅशन’ने; पारंपरिक खणाचा पुन्हा नव्याने ट्रेंड – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे –  गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. यंदाचा गुढीपाडवा २ एप्रिल २०२२ रोजी आहे. अनेकांच्या घरामध्ये तर आता पासूनच मराठी नवं वर्षाची तयारी सुरु झाली आहे.

सर्वच मुली अगदी लहान मुलींपासून मोठ्या महिला सुद्धा या दिवशी सुंदर सजूनधजून बाहेर पडलेल्या दिसतात. म्हणूनच मराठी नवं वर्षाचे निमित्त साधून आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्रीय परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या ‘खणाची साडी’ चे काही फॅशन स्टाईल घेऊन आलो आहोत…

आताच्या तरुण मुलींना टिपिकल साडीपेक्षा काहीतरी वेगळं हवं असतं. आणि यासाठी हल्लीच्या मुली खणाच्या साडीला विशेष महत्व देतात. अनेक उत्सवांना या प्रकारची साडी आवर्जून नेसली जाते. दरम्यान, या खणांच्या साड्या आता एका वेगळ्या ढंगात आणि आकर्षक लूक मध्ये पाहायला मिळत आहेत.

खास डिझाइन केलेल्या या साड्यांना मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनी सुद्धा चांगलीच पसंती दिल्याचं दिसून येत आहे. पारंपरिक लूकला इंडो वेस्टर्न टच कसा देता येईल याकडे कल वाढला आहे. आणि आता फॅशनच्या दुनियेत खणापासून वेगवेगळे प्रयोगही केले जात असल्याचे दिसून येते.

प्लेन खणाची साडी उठून दिसतेच पण नथीचा आकडा, चंद्रकोर, सरस्वती, स्क्वेअर, पोपट, कलमकारी अशा डिझाइन्सनी सजलेली, नटलेली खण साडी समस्त महिला वर्गाला भुरळ घालत आहे. बाजारात आणि ऑनलाईन शॉपिंग मार्केट मध्ये सुद्धा या साड्यांची मोठी मागणी आहे.

दुसरीकडे पहिला गेले तर खणाच्या साडीप्रमाणे खणाचे कुर्ते, वनपीस यालाही अधिक पसंती मिळत आहे. यातही नथ, मोर, पोपट, कलमकारी पॅटर्नचे पॅचवर्क केलेले ड्रेस जास्त खुलून दिसतात. दरम्यान, तुम्ही सुद्धा यंदाच्या मराठी नवं वर्षासाठी कोणता वेगळा आणि सुंदर लूक करणार असाल तर खाणाची साडी किंवा कुर्ती नक्की ट्राय करून पहा.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar