पुणे – नैवेद्य दाखवायचा असो , सवाष्ण बोलवायची असो व ब्राह्मणांना जेवायला बोलावले असो. याप्रसंगी भोजन केळीच्या पानवर वाढण्याची प्रथा आपल्याकडे आहे. या प्रथेमागे धार्मिक अधिष्ठान तर आहेच शिवाय वैद्यकीय कारणेही आहेत. जाणून घेऊया त्याविषयी ….
केळीच्या पानावर गरम भोजन वाढल्याने त्या पानांमधली असलेली पोषकतत्वे अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असते. केळीच्या पानवर जेवण केल्यास डाग- खाज , पुरळ , फोडं अशा समस्या दूर होतात. केळीच्या पानांमध्ये अधिक प्रमाणात “एपिगालोकेटचीन गलेट” आणि इजीसीजीसारखे “पॉलिफिनोल्स अँटिऑक्सीडेंट ” आढळतात.
केळीच्या पानावर जेवायचे महत्व …
पाटावर बसून केळीच्या पानावर जेवणे, हे आरोग्यदायी असते.
केळीचे पान हे पवित्र, चैतन्ययुक्त आणि दैवी असते.
इ. केळीच्या पानात जेवणार्या व्यक्तीला होणारे लाभ :
-केळीचे पान सात्त्विक असल्याने जेवणार्या व्यक्तीचे शरीर आणि मन यांची सात्त्विकता २ टक्के वाढू शकते.
-केळीच्या पानातील चैतन्यामुळे शरीराची शुद्धी होते.
-केळीच्या पानावर जेवल्यामुळे व्यक्तीला ‘चांगले वाटणे’ हा अनुभव येतो. तसेच पोटाचे विकार होत नाहीत.
-व्यक्तीचे मन शुद्ध होते आणि ते शांत रहाते .