मुंबई – बंगाली सौंदर्य आणि बॉलिवूड अभिनेत्री ‘मौनी रॉय’ ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. मौनीने अनेक टॉप टीव्ही शो केले आहेत. आपल्या अभिनयाने मौनी घरोघरी लोकांच्या मनावर राज्य केले आहे. तिच्या सौंदर्याने आणि किलर स्टाईलने चाहतेही घायल झाले आहेत. मौनी रॉय ही छोट्या पडद्यावरीलच नव्हे तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. मौनी रॉयची मोठ्या पडद्यावरची जादू तिच्या अपेक्षेप्रमाणे चालली नाही ही वेगळी गोष्ट आहे.
मात्र, अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असल्याचं नेहमी पाहायला मिळत. लाखो दिलांची धडकन आणि सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंगवर असणाऱ्या मौनी रॉयचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. तिच्या अदांनी आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांनां नक्कीच वेड लावले असेल यात कोणतीच शंका नाही. मौनी आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असते. तिला योगा करणे आणि जिमला जाणे देखील खूप आवडते. स्वतः अभिनेत्रीने याबद्दल खुलासा केला आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान मौनी रॉयने तिच्या फिटनेस रुटीन आणि डाएटबद्दल सांगितले. यादरम्यान तिने ती दिवसभरात काय खाते आणि कोणता वर्कआउट फॉलो करते हे सांगितले होते. मौनी रॉय तिच्या दिवसाची सुरुवात हळद पाणी किंवा दालचिनीच्या पाण्याने करते. ती सकाळी उठून एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हळद मिसळून पिते. सकाळी उठल्यावर हळदीचे पाणी पिण्याचा सल्लाही फिटनेस तज्ञ देतात.
हळदीचे पाणी केवळ रोगप्रतिकारक शक्तीच वाढवत नाही तर शरीराला डिटॉक्सिफाय करते. हळदीचे पाणी पिल्यानंतर काही वेळाने अभिनेत्री दालचिनीचे पाणी सेवन करते. दालचिनीचे पाणी वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे. स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी अभिनेत्री दिवसभरात सुमारे 8-10 ग्लास पाणी पिते. जेणेकरुन त्यांच्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर काढले जातील.
जिमला जाण्यापूर्वी मौनी रॉय फळे आणि ओट्ससह खाते. वर्कआउट केल्यानंतर ती प्रोटीन शेक, ग्रीन बीन, सलाड खाते. मौनीला नाश्त्यात इडली, पोहे वगैरे खायला आवडते. दुपारच्या जेवणात अभिनेत्री कडधान्ये, कोशिंबीर, हिरव्या कोशिंबीर, फळे आणि भाज्या खाते. तसेच तिला रात्रीच्या जेवणात चपाती आणि भाज्या खायला आवडतात.
मौनी रॉय स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज किमान 30 मिनिटे डान्स करते. याशिवाय ती नियमितपणे योगा आणि व्यायाम करते. जिममध्ये जास्त वेळ घालवण्याऐवजी मौनी रॉय डान्सला प्राधान्य देते. तासभर नृत्य केल्याने 400 कॅलरीज बर्न होतात. असं ती सांगते.
The post ‘मौनी रॉय’च्या स्लिम फिगरवर चाहते झाले फिदा; फिटनेससाठी घेते प्रचंड मेहनत, तुम्हीही कराल कौतुक ! appeared first on Dainik Prabhat.
