error: Content is protected !!
नवी दिल्ली : तुम्ही जर खाद्यप्रेमी असाल आणि त्यातही तुम्हाला मोमोज खायला आवडत असतील तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. मोमोज खाणाऱ्यांसाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने AIIMS ने महत्वाचा सल्ला दिला आहे. दिल्ली येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचा मोमो खाल्ल्यानंतर मृत्यू झाला आहे. त्यानंतर एम्स कडून महत्वाचा सल्ला देण्यात आला आहे. मोमोज गुळगुळीत असतात. त्यामुळे जर कुणी मोमोज नीट चावले आणि गिळले नाहीत तर श्वास गुदमरू शकतो. मृत्यूचा धोका संभवतो. त्यामुळे मोमोज खाताना विशेष काळजी घ्या, असे एम्सच्या अधिसूचनेत म्हणण्यात आले आहे.
काय आहेत एम्स कडून आलेल्या सूचना
–मोमोज गुळगुळीत असतात.
— त्यामुळे जर कुणी मोमोज नीट चावले आणि गिळले नाहीत तर श्वास गुदमरू शकतो.
–मृत्यूचा धोका संभवतो.
–मोमोज हे स्ट्रीटफूड आहे. त्यामुळे हे बनवताना स्वच्छतेची तितकीशी काळजी घेतली जात नाही.
— मोमोज मैद्यापासून तयार केलं जातं. त्यामुळे स्वादुपिंडाशी संबंधित आजार उद्भवतात.
–त्याचा इन्सुलिन निर्मिती क्षमतेवर परिणाम होतो.
दरम्यान मोमोज खाल्ल्यानंतर दिल्लीतील 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याच्या पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये त्याच्या मृत्यूचं कारण समोर आलं आहे. त्याच्या श्वसनमार्गामध्ये मोमो अडकलं होतं. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मोमोजमुळे त्याचा गुदमरला आणि या व्यक्तीचा मृत्यू झाला. अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे तुम्ही देखील मोमोज प्रेमी असाल तर आवश्य काळजी घ्या
error: Content is protected !!
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar