Saturday, August 8, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

मोबाईलच्या कमी स्टोरेजमुळे हैराण असाल तर करा ‘हे’ उपाय !

by प्रभात वृत्तसेवा
December 13, 2021
in लाईफस्टाईल
A A
मोबाईलच्या कमी स्टोरेजमुळे हैराण असाल तर करा ‘हे’ उपाय !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आज आपल्या जवळपास सर्वांकडे स्मार्टफोन आहे. त्याच्या आगमनाने आपले जीवन खूप सोपे झाले आहे. आज आपली अनेक महत्त्वाची कामे मोबाईलच्या मदतीने सहज पार पडतात. मात्र, मोबाईल वापरताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यापैकी, स्टोरेज संपण्याची समस्या सर्वात सामान्य आहे. अनेकदा असे दिसून येते की जेव्हा कधी आपल्या फोनची स्टोरेज मेमरी पूर्ण होते, त्यानंतर फोनची प्रोसेसिंग गती खूपच कमी होते. त्यामुळे मोबाईल खूपदा हँग होतो. अशा परिस्थितीत लहानसहान गोष्टी करण्यात आपला बराच वेळ वाया जातो. जर तुम्हीही मोबाईलच्या स्टोरेज संपण्याच्या समस्येने हैराण असाल तर आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. चला, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

* ऍप कॅशे मेमरी वरचेवर साफ करा
आपल्या फोनमध्ये असे अनेक ऍप्स आहेत, जे बॅकग्राउंडमध्ये कॅशे मेमरी साठवून ठेवतात. जेव्हाही आपण हे ऍप्स वापरतो तेव्हा आपले उपक्रम कॅशे मेमरी स्वरूपात साठवले जातात. अशा परिस्थितीत तुम्ही वेळोवेळी सेटिंगमध्ये जाऊन या ऍप्सची कॅशे मेमरी डिलीट करत राहावे.

* अनावश्यक फोटो आणि व्हिडिओ हटवा
अनेकदा आपल्या फोनमध्ये असे अनेक फोटो, व्हिडिओ, फाइल्स आणि फोल्डर्स असतात, ज्यांचा आपण वापर करतच नसतो. हे अनावश्यक फोटो आणि व्हिडिओ मोबाईल फोनवर भरपूर स्टोरेज व्यापतात. त्यामुळे आपण ते डिलीट करावेत.

* अनावश्यक ऍप्स अनइंस्टॉल करा
तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून अनावश्यक ऍप्स अनइंस्टॉल करा. असे ऍप्स तुमच्या फोनवर भरपूर स्टोरेज घेतात, ज्यामुळे तुमच्या फोनच्या प्रोसेसिंग स्पीडवर परिणाम होतो.

* महत्त्वाच्या फाइल्स क्लाउड स्टोरेजमध्ये सेव्ह करा
तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाइल्स गुगलच्या क्लाउड स्टोरेजमध्ये सेव्ह करा. तुम्हाला त्याचा अधिक फायदा मिळेल. यामुळे तुमचा स्टोरेज वापर लक्षणीयरीत्या कमी होईल. त्याचबरोबर मोबाईल हँग होण्याच्या समस्येपासूनही सुटका होईल.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar