
मोतीबिंदू : रुग्णांना आता ऑपरेशनची गरज नाही?
July 18th, 1:14pmJuly 18th, 1:14pm
प्रभात वृत्तसेवाlatest-news
वयाच्या एका विशिष्ट टप्यात प्रत्येक व्यक्तीला डोळ्यांच्या आजाराचा सामना करावा लागतो. त्यापैकी एक म्हणजेच मोतीबिंदूचं ऑपरेशन. पण या ऑपरेशन पासून सुटका मिळवण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी मोतीबिंदूवर उपचारासाठी अगदि ऑपरेशन न करता सोप्पी,स्वस्त पद्धत तयार केली आहे.
भारत सरकारच्या विज्ञान आणि प्रोद्योगिक विभागाअंतर्गत येणाऱ्या एका स्वायत्ता संस्थेच्या नॅनो विज्ञान आणि प्रौद्योगिकी संस्था (आईएनएसटी) मधील वैज्ञानिकांची एका टीमने गैर-स्टेरॉयडल अँन्टी-इंफ्लेमेटरी ड्रग -एनएसएआयडी एस्पिरिनचा वापर करून नॅनोरोड डेवलप केलं आहे. आणि या औषधांचा उपयोग ताप,सूजन,शरीराच्या दुखापतीला कमी करण्यास मदत करतो.
तसेच हे औषध मोतीबिंदूवर सुद्धा प्रभावी ठरल्याचे सांगितले जाते. आक्रामक छोटे अणु यांवर आधारित नॅनोथेरेप्यूटिक्स रुपात आढळते. जर्नल ऑफ मॅटेरियल्स केमिस्ट्री बी मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनाद्वारे एका स्वस्त आणि सरळ पद्धतीने मोतीबिंदूची वाढ रोखण्यास मदत करते.
स्व-निर्माण करुन अँन्टी-ॲग्रीगेशन क्षमतेचा उपयोग मोतीबिंदूवर एक प्रभावी तसेच गैर-प्रमुख लहान अणु-आधारित नॅनोटेराप्यूटिक्सच्या अंतर्गत याची निर्मिती करण्यात आली आहे. एस्पिरिन नॅनोरोड क्रिस्टलीय प्रोटीन आणि याच्या विघटनाने होणाऱ्या विभिन्न पेप्टाइड्सच्या एकत्रीकरणाला रोखू शकते आणि यामुळेच मोतीबिंदू वाढण्याच्या प्रकीयेला रोखण्यात येते.
मोतीबिंदू आपल्या डोळ्यांमध्ये लेंस बणवणाऱ्या क्रिस्टलीय प्रोटीनच्या संरचनेत अडचणी निर्माण करते, यामुळे क्षतिग्रस्त किंवा अव्यवस्थित प्रोटीन एकत्रीकरण होत असतांना डोळ्यांवर एकीकडे नीळ्या तसेच भूरकट रंगाचे आवरण तयार होते, आणि शेवटी हे आवरण लेंसच्या पारदर्शकतेवर प्रभाव टाकते. म्हणूनच, आय-ड्रॉपच्या स्परूपातील एस्पिरिन नॅनोरोड्स मोतीबिंदूच्या उपचाराकरीता एक प्रभावी रुपात कार्य करणारे औषध ठरले आहे.
यांच्या एकत्रीकरणामुळे मोतीबिंदूची वाढ रोखण्यासाठी एक प्रमुख उपचाराची पद्धत तयार करण्यात आली आहे. तसेच हि पद्धत मोतीबिंदूला रोखण्यासाठी अत्यंत लाभकारी ठरल्याचे सांगण्यात येत आहे.