Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

मोठी बातमी ! HMPV व्हायरसची राज्यात एन्ट्री ; नागपुरातील दोन लहान मुलांना बाधा

by
January 7, 2025
in आरोग्य वार्ता
A A
मोठी बातमी ! HMPV व्हायरसची राज्यात एन्ट्री ; नागपुरातील दोन लहान मुलांना बाधा
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

HMPV Outbreak ।  जगाला धडकी भरवणाऱ्या कोरोना महामारीनंतर आता चीनमध्ये नव्या व्हायरसने धुमाकूळ घातल्याचे समोर आले आहे. चीनमधील नव्या व्हायरसने पुन्हा एकदा जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. त्यातच या व्हायरसची काल देशात दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आता या व्हायरसने राज्यात एन्ट्री केली आहे.

दोन लहान मुलांना व्हायरसची बाधा HMPV Outbreak । 

नागपुरात एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. त्यांचा HMPV अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला या नव्या व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

काल  देशात  बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले होते.  तर आज राज्यात दोन लहान मुलांना याची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही लहानग्यांना HMPV ची लागण झाल्याचे निदान 3 जानेवारीला झाले होते. दोघांचाही HMPV चा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती HMPV Outbreak । 

व्हायरसची लागण झालेल्या दोन्ही मुलांमध्ये खोकला आणि तापासारखी लक्षणं दिसत होती. दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही आणि दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPV ची लागण झाली होती.  दोघांनाही योग्य औषधोपचारानंतर घरी पाठवण्यात आले. दोघांमध्येही सामान्य लक्षणं दिसत होती. कोणतीही गंभीर लक्षणं नसल्यामुळे दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही.

खबरदारी म्हणून काय करावं?
* खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा.
*  साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत.
*  ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
* भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
* संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.

काय करू नये ?
* खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं. यामुळे संसर्ग लगेच पसरतो.
* टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं.
* आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये. शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावं.
*  डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.

Join our WhatsApp Channel

The post मोठी बातमी ! HMPV व्हायरसची राज्यात एन्ट्री ; नागपुरातील दोन लहान मुलांना बाधा appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar