
मूळव्याधीला सामोरं जाताना…
June 15th, 9:06amJune 15th, 9:06am
प्रभात वृत्तसेवाlatest-news
सध्या बदलत्या जीवनशैलीचा आजार म्हणून मूळव्याधीकडं (पाइल्स) पाहिलं जातं. कोणात्याही घरातील स्त्री, पुरुष अथवा मुलगा, मुलगी यांना हा आजार होण्याची शक्यता असते.
बदललेली जीवनशैली आणि आहारामुळे मूळव्याधीची समस्या सर्वत्र भेडसावते आहे, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. या आजाराविषयी फारसं मोकळेपणानं बोललं जात नाही. त्याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. पाइल्ससह फिशर आणि भगंदराचे आजार दिसून येतात.
मूळव्याधीचा आजार टाळण्यासाठी पुढील प्रकारच्या पदार्थांचे सेवन टाळावे
- कॉफी, चहा, चॉकलेट
मूळव्याध असो की फिशर, भगंदर किंवा अन्य कोणताही आजार… त्याचे निदान व उपचार लवकरात लवकर व तज्ज्ञ डॉक्टरांकडून झाले तर आनंददायी जीवन जगण्याची संधी प्रत्येकालाच मिळू शकते. त्यासाठी गरज आहे ती प्रत्येकाने यासंबंधीचे गैरसमज मनातून काढून टाकून सर्वांना आरोग्यसाक्षर करण्याची. या कामात तुमचा आमचा सर्वांचाच हातभार लागला पाहिजे.
(शब्दांकन : बी. अशोक)
डॉ. अश्विन पोरवाल