बदललेल्या जीवनशैली आणि आहारामुळे मूळव्याधाची समस्या घरोघरी भेडसावत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. प्रश्न आहे तो या आजारांविषयी मोकळेपणाने बोलण्याचा आणि समाजात त्याबाबत जनजागृती करण्याचा. पाईल्ससह फिशर व भगंदराचे आजार सार्वत्रिकपणे दिसून येतात.
मूळव्याधाचे दोन प्रकार असतात. विनारक्तस्त्राव (मोडाची मूळव्याध) आणि रक्तस्त्रावासहित (रक्तमूळव्याध). गुदद्वाराच्या सभोवताली आतील बाजूस असलेल्या रक्तवाहिन्या बाहेर आल्यामुळे तेथे सातत्याने तीव्र वेदना होतात व काटा टोचल्यासारखे वाटते. परिकर्तिका (फिशर) यामध्ये गुदभागी भेगा पडतात व त्यामुळे तीव्र वेदना होतात. तीव्र वेदनांसह आग होणे आणि मलाबरोबर रक्त बाहेर पडते. तर भगंदरामध्ये (फिस्टुला) गुदाच्या जवळ जखम होते. बाहेरून बरी झाली तरी ही जखम गुदाच्या आतल्या बाजूपर्यंत वाढत जाते. जखमेतून वारंवार रक्त किंवा पू येण्याच्या रुग्णाच्या तक्रारी असतात.
पारंपरिक उपचार पद्धतीनुसार होणा-या शस्त्रक्रिया अतिशय वेदनादायी असत आणि त्यानंतर रुग्णाला बरे होण्यास खूप वेळ लागत असत. परंतु सध्याच्या वेगवान आयुष्यात कामाच्या ताणामुळे कमी वेळेत बरे करणाऱ्या उपचारांकडे रुग्णांचा कल दिसून येतो. अशा जलद उपचारांमध्ये अग्रगण्य असलेल्या लेसर तंत्राच्या उपचाराचा समावेश होतो. लेसर हेमरॉईडप्लास्टी (एलएचपी) ही हिलिंग हॅंड्स क्लिनिकमध्ये अवलंबली जाणारी अत्याधुनिक शस्त्रक्रिया पद्धती वेदनारहित असून कमीतकमी छेद घेऊन काही तासांतच रुग्णाला आराम मिळवून देणारी वैशिष्टयपूर्ण पद्धत आहे.
मलविसर्जनाच्या वेळेस रक्तस्त्राव झाल्यामुळे लोक घाबरून जातात. मलमार्गात (रेक्टल) होणा-या रक्तस्त्रावावर उपचार उपलब्ध आहेत. एलएचपी उपचार तंत्र हे मोडाच्या मूळव्याधासाठी आणि भगंदरावरील उपचारासाठी फिलेसी (फिस्टुला ट्रॅक्ट लेसर क्लोजर) उपचार तंत्र उपलब्ध आहे. मूळव्याधाच्या प्राथमिक टप्प्यात जेव्हा रुग्णांना मलविसर्जनाच्या वेळी होणारा रक्तस्त्राव आणि वेदना रोखता येत नाहीत तेव्हा हे दोन्ही उपचार तंत्र प्रभावी ठरतात.
त्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत:
शस्त्रक्रियेदरम्यान छेद घेतला जात नाही त्यामुळे टाके घालण्याची गरज नाही.
शस्त्रक्रियेनंतर होणारा त्रास कमीतकमी, लवकर बरे होण्यास मदत होते.
शस्त्रक्रियेनंतर काही तासात रुग्ण घरी जातो व एक-दोन दिवसात कामावर रुजू होऊ शकतो.
शस्त्रक्रियेदरम्यान चिमट्यासारख्या बाह्य वस्तूंचा वापर नाही.
संबंधित भागापुरती भूल देऊन किंवा कमी वेळ भूल देऊन शस्त्रक्रिया केली जाते.
मूळव्याध असो की फिशर, भगंदर किंवा अन्य कोणताही आजार, त्याचे निदान व उपचार लवकरात लवकर व तज्ज्ञ डॉक्टरांकडून झाले तर आनंददायी जीवन जगण्याची संधी प्रत्येकालाच मिळू शकते. त्यासाठी गरज आहे ती प्रत्येकाने यासंबंधीचे गैरसमज मनातून काढून टाकून सर्वांना आरोग्य साक्षर करण्याची. या कामात तुमचा आमचा सर्वांचाच हातभार लागला पाहिजे.
आजच्या जीवनपद्धतीत वेग अधिक महत्त्वाचा घटक ठरतो आहे. वेळ नाही आणि कामे तर उरकायलाच हवीत अशा चिमटीत आपण सापडलो आहोत. त्यामुळे वेळेवर खाणे, पुरेसे पाणी पिणे आणि आवश्यक तेवढी विश्रांती घेणे शक्य होत नाही. मात्र शरीर या अनियमिततेबद्दल आपल्याला कधीच माफ करत नसते. त्यातूनच किरकोळ वाटणारी पण त्रासदायक दुखणी सुरू होतात. त्यावर हे उपचार करावेत.
उन्हाळे लागणे :उन्हाळयात बर्याच वेळा लघवीच्या जागी जळजळ होते. यालाच उन्हाळे लागणे म्हणतात. यावर नारळाचे पाणी, ताक, संत्र्याचे रस भरपूर प्यायल्याने फरक पडतो.
सतत तहान लागणे :श्रीखंड खाल्ल्याने सतत तहान लागणे कमी होते. तेलकट पदार्थ खाल्ल्याने लागत असलेली तहान ही श्रीखंड खाल्ल्याने कमी होते.
मूळव्याधीचा त्रास होत असलेल्यांनी मुळा आणि कांदा यांची दही घातलेली कोशिंबीर 10 दिवस एक वाटी या प्रमाणात खावी. कोशिंबीर खाल्यापासून तासातच आराम पडतो. तरीही आठ दिवस खावी.
थकवा नाहीसा करणे :अतिश्रमाने आलेला थकवा नाहीसा करण्यासाठी उन्हाळयाच्या दिवसात गार पाण्याने तर हिवाळयाच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करावी. दमणूक कमी करायची असेल तर अननस आणि मोसंबी यांचा रस एकत्र करून प्यायल्यानेही थकवा नाहीसा होतो.