Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

‘मुव्ह फॉर हेल्थ’ उत्तम आरोग्यसाठी आवश्यक

by
May 9, 2023
in आरोग्य वार्ता
A A
‘मुव्ह फॉर हेल्थ’ उत्तम आरोग्यसाठी आवश्यक
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मुव्ह फॉर हेल्थ’ म्हणजेच शरीराच्या आरोग्यासाठी हालचाल करणे असे, आपण म्हणू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने सन 2002 मध्ये हया उपक्रमाची सुरुवात केली. यामागचे मुख्य कारण म्हणजे आजकालच्या धावपळीच्या जगात जास्तीत जास्त माणसांनी बैठी जीवनशैली अवलंबिली आहे, जेणेकरून शारीरिक हालचाल खूप कमी झाली आहे, ज्याचा अनुचित परिणाम शरीरावर व आरोग्यावर होत आहे.

त्याचाच परिणाम होऊन जीवनशैली संबंधित रोगामध्ये वाढ होत चालली आहे.
उदा. उच्च रक्‍तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, कर्करोग, आम्लपित्त, जठार आणि यकृताचे आजार, दम्याचे आजार, तसेच विविध व्याधी अथवा आजार होत आहेत.

“मुव्ह फॉर हेल्थ’ हा दिवस साजरा करण्यामागे मुख्य हेतू असा आहे की, आरोग्य आणि आरोग्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देणे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका सर्वेक्षणानुसार जगातील 60% लोकसंख्या ही निष्क्रिय जीवनशैली जगतात, म्हणजेच ही लोकसंख्या कुठल्याही प्रकारचे व्यायाम करत नाही.

आरोग्यदायी जीवनशैलीसाठी  काय करावे?
1. नियमित व्यायाम करणे, मग तो कुठलाही प्रकार असो, चालणे, योगासने, जिम करणे. इत्यादी.
2. शारीरिक हालचाल वाढविणे. शारीरिक कष्टाची सवय ठेवणे. उदा. घरातील घरकाम पूर्णतः मावशीवर अवलंबून न ठेवता स्वत: करणे.
3. सकस आहार; अर्थातच शक्‍यतो घराच्या जेवणाला प्राधान्य देणे. पथ्यकारक तसेच आरोग्यदायी आहार घेणे.
4. झोपेची वेळ सांभाळणे. झोपेमुळे शरीराची झीज भरून निघते, तसेच मानसिक आरोग्य ही स्वस्थ राहते.
5. शारीरिक स्वछता ठेवणे.
काय टाळावे?
1. धूम्रपान
2. मद्यपान
3. रात्री जागरण, झोपेच्या अनियमित वेळा टाळाव्यात.
4. अवेळी जेवण, गोड पदार्थ, पिष्टमय पदार्थ, बेकरी उत्पादने,
5. अतिव्यायाम
6. ताण तणाव, नैराश्‍य, तसेच नकारात्मक विचार.
चला तर मग ह्या “मुव्ह फॉर हेल्थ’च्या निमित्त आरोग्यमयी जीवन जगण्याची प्रतिज्ञा घेऊयात

 

The post ‘मुव्ह फॉर हेल्थ’ उत्तम आरोग्यसाठी आवश्यक appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar