Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

मुलांसाठी चांगली आई बनायचंय ? प्रत्येक मातेसाठी ‘हा’ आहे मोलाचा सल्ला !

by
October 13, 2022
in लाईफस्टाईल
A A
मुलांसाठी चांगली आई बनायचंय ? प्रत्येक मातेसाठी ‘हा’ आहे मोलाचा सल्ला !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मुलाला जन्म देणे जितके कठीण आणि वेदनादायक आहे, तितकेच मुलाला चांगले वाढवणे अवघड आहे. गर्भधारणा झाल्यापासून स्त्री तिच्या बाळाचा विचार करू लागते. त्याच्या आरोग्याची आणि भविष्याची काळजी करत नऊ महिने गर्भात राहिल्यानंतर असह्य वेदना सहन करून ती नवजात बाळाला जन्म देते.

गर्भवती महिलेचा मुलाला जन्म देईपर्यंतचा प्रवास अवघड नसतो. मुलाच्या जन्मानंतर मात्र तिची खरी परीक्षा सुरू होते. मुलाचा सांभाळ करताना स्त्री खर्‍या अर्थाने आई बनते. मुलाला वाढवताना तिला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मुलाचे भविष्य घडविण्यासाठी आईला अनेक त्याग करावे लागतात. चांगली आई होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे असते.

चला तर मग, आज जाणून घेऊया मुलाच्या संगोपनात उपयोगी पाडण्याबरोबरच तुम्हाला एक चांगली आई होण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या या काही टिप्स…..

० स्वत:बद्दल जागरूक राहा

मुलाचे संगोपन करण्यासाठी आपल्याला त्याच्याबद्दल इत्यंभूत माहित असणे आवश्यक आहे. पण मुलाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्हाला आधी स्वतःला समजून घ्यावे लागेल. प्रत्येक माणसामध्ये काही बलस्थाने आणि काही कमजोरी असतात. आईला तिच्यातील बलस्थाने आणि कमकुवतपणाची जाणीव असेल तर ती मुलालाही सहज समजून घेऊ शकते.

० खंबीर व्हा

आईला सुपरवुमन मानले जाते. आई आणि मुलाचे नाते हे भावनिकदृष्ट्या जोडलेले असते. मुलाचे सुख-दु:ख, पराजय-विजय, प्रत्येक गोष्टीचा आईच्या भावनांवर परिणाम होतो. अशा स्थितीत जेव्हा मूल आईचे मन दुखावणारे असे कृत्य किंवा गोष्ट बोलते, तेव्हा ती अशक्त होऊ शकते. म्हणून आई खंबीर असावी. आईची शारीरिक आणि मानसिक दोन्ही शक्ती तिला आणि तिच्या मुलाला प्रत्येक संकटातून वाचवू शकते.

० समजून घ्या

आईने आपण काय बोलतो ते ऐकावे आणि समजून घ्यावे अशी प्रत्येक मुलाची इच्छा असते. मूल लहान असो किंवा मोठे असो, आईने त्याचे विचार, भावना यांचे निरीक्षण करावे आणि न सांगता समजून घ्यावे अशी अपेक्षा असते. जर आईने मुलाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले किंवा त्यांचे ऐकले नाही तर मुले तिच्यापासून दूर जाऊ लागतात.

० नम्र वागणूक ठेवा

मुलांशी चांगले संबंध ठेवायचे असतील तर आईने नम्र वागणूक अंगीकारली पाहिजे. आई-वडीलही माणूसच असतात, त्यामुळे त्यांच्याकडून चुका होऊ शकतात. पण तुम्ही तुमच्या चुका कशा हाताळता हे महत्त्वाचे आहे. मुलांसमोर तुमची चूक नाकारणे किंवा तुमच्या चुकीबद्दल त्यांची माफी न मागणे यामुळे मुलांसमोर तुमची चुकीची प्रतिमा निर्माण होते. म्हणून नम्र व्हा आणि जेव्हा गरज असेल तेव्हा आपली चूक मान्य करा.

० मुलांना आधार द्या

चांगल्या आईचा एक गुण म्हणजे आधार देणे. मुले जेव्हा निर्णय घेतात तेव्हा अनेकदा पालकांचे मत त्यांच्याशी जुळत नाही. अशा परिस्थितीत मुलांना पालकांचा पाठिंबा मिळाला नाही तर ते स्वतःचे नुकसान करू शकतात. आईने मुलांच्या आवडीनिवडी आणि नापसंतीचे भान ठेवले पाहिजे. मुलांना त्यांच्या निर्णयात पाठिंबा दिला पाहिजे. मुले चुकीच्या मार्गावर असतील, तर त्यांना समजावून सांगा आणि त्यांना सपोर्ट करण्याबद्दल नेहमी बोला.

The post मुलांसाठी चांगली आई बनायचंय ? प्रत्येक मातेसाठी ‘हा’ आहे मोलाचा सल्ला ! appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar