Saturday, August 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

मुलांचा रडण्याचे कारण सांगणार ब्रेसलेट; हरियाणातील जांभेश्वर विद्यापीठाचे अनोखे संशोधन

by प्रभात वृत्तसेवा
September 6, 2021
in लाईफस्टाईल
A A
मुलांचा रडण्याचे कारण सांगणार ब्रेसलेट; हरियाणातील जांभेश्वर विद्यापीठाचे अनोखे संशोधन
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

चंदिगड – हरियाणातील गुरु जम्भेश्वर विद्यापीठातीलव संशोधकांनी एका अनोख्या अशा ब्रेसलेटचा शोध लावला असून हे ब्रेसलेट परिधान करणाऱ्या लहान मुलांच्या रडण्याचे निश्चित कारण त्यामुळे नोंदवले जाणार आहे.

लहान मुले जेव्हा रडायला लागतात तेव्हा त्यांना जर त्याचे कारण सांगता येत नसेल तेव्हा आई आणि वडील खूप घाबरून जातात रडण्याचे कारण शोधणे अवघड जाते अशा वेळी कारण एक असते आणि उपाय दुसरा केला जाण्याचा धोकाही असतो या समस्येवर मात करण्यासाठीच या विद्यापीठाने या अनोख्या ब्रेसलेट चा शोध लावला आहे.

विद्यापीठातील संशोधक विजयपाल आणि रणजित मदन यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून हे ब्रेसलेट तयार केले आहे. या संशोधनाची नोंद इंडियन पेटंट जर्नलमध्ये करण्यात आली असून त्याचे पेटंट लवकरच या विद्यापीठाला मिळण्याची शक्यता आहे. हे ब्रेसलेट एखाद्या स्मार्टवॉच प्रमाणे लहान मुलाच्या मनगटाला बांधले जाईल आणि ते मोबाईलला कनेक्ट केले जाईल त्या आधारे मुलांच्या सर्व व्यवहारांवर नजर ठेवण्यात येईल मुलांच्या शरीराचे तापमान त्यांच्या रडण्याचा आवाज ह्यावरही लक्ष ठेवले जाईल.

मुलाच्या रडण्याच्या आवाजावरून त्याला निश्चित कसला त्रास होत आहे याबाबतचा निष्कर्ष काढला जाणार आहे मुलाच्या शरीराचे तापमान आणि हृदयाची धडधड योग्य असेल तर त्या मुलाला कोणताही त्रास होत नाही असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो.

या तंत्रज्ञानामध्ये आधीच काही गोष्टी फीड करून ठेवण्यात आल्या असून मुलांना सर्वसाधारणपणे जे त्रास होतात त्याची लक्षणे तेथे नोंदविण्यात आली आहेत त्यामुळे मुलांचे पोट दुखणे किंवा त्यांच्या गळ्यामध्ये काही अडकणे किंवा सर्दी यासारख्या गोष्टींची नोंद करण्यात आली असून या कारणामुळे जर मुले रडत असतील तर त्याचे कारण लगेचच या ब्रेसलेट च्या माध्यमातून समोर येणार आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar