Saturday, November 8, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

मुंबईत वंशाच्या दिव्यासाठी १५०० इंजेक्शन टोचली; ८ वेळा गर्भपात?

by प्रभात वृत्तसेवा
August 22, 2021
in आरोग्य वार्ता
A A
मुंबईत वंशाच्या दिव्यासाठी १५०० इंजेक्शन टोचली; ८ वेळा गर्भपात?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मुंबई- वंशाचा दिवा मुलगा पाहिजे यासाठी पती आणि सासरच्या मंडळींनी माझ्या इच्छेविरुद्ध ‘प्री इम्पलांटेशन जेनेटिक डायगनोसीस’ साठी परदेशात घेऊन गेले त्या ठिकाणी मला दीड हजार इंजेक्शन देण्यात आली. या ट्रीटमेंटमुळे माझे ८ वेळा अनैसर्गिक गर्भपात करण्यात आला असल्याचा आरोप एका पीडित विवाहितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, याप्रकरणी दादर पोलिसांनी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करून तपास सुरु केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

पीडित महिला उच्चशिक्षित असून तिच्या सासरची मंडळी देखील उच्चशिक्षित दादर परिसरात राहणाया आहे. पीडित महिलेला ११ वर्षाची मुलगी आहे. वंशाला दिवा पाहिजे म्हणून सासरच्या मंडळींनी पीडित महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला, तेवढ्यावर ना थांबता पीडितेच्या पोटात मुलाचा गर्भ राहण्यासाठी तिच्यावर मुंबईतील विविध प्रसिद्ध डॉक्टरकडून उपचार सुरु केले होते. या सर्व गोष्टीला या पीडित महिलेचा विरोध होता.

पुढे पीडितेने असे म्हटले आहे की, ‘प्री इम्पलांटेशन जेनेटिक डायगनोसीस’ (जन्मापुर्वी लिंग तपासणीसाठी बीजचे अंमजबजावणी) या उपचारासाठी पतीने तिच्यावर बळजबरी केली व काही चाचण्या करण्यासाठी तिला परदेशात नेण्यात आले होते. परदेशात तिच्यावर जवळपास ८ वेळा गर्भधारणेच्या आधी एम्ब्रीयोच्या लिंगाची (बीजाची) परीक्षा करुन तिच्यावर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत.

हया उपचारासाठी तिच्यावर जवळपास दीड हजारपेक्षा अधिक हाँरमोनल व स्टीराँइड इनजेक्शन देण्यात आले असल्याचे पीडित विवाहितेने जबाबात म्हटले आहे. तसेच भरपुर ताकदीचे डोस देण्यात आल्यामुळे माझ्या संपुर्ण शरीरात वेदना होत आहेत. तसेच शरीर हे काळे निळे पडले आहे. या उपचारामुळे सुमारे ८ वेळा अनैसर्गिक गर्भपात तिच्या इच्छेविरोध करण्यात आला असल्याचा आरोप तिने जबाबात केला आहे.

यामुळे तिला मणक्याचा त्रास होऊन उच्च रक्तदाबाचा त्रास होत आहे. दादर पोलिसांनी पीडित विवाहितेच्या तक्रारी वरून सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दखल केला असून याप्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांची दिली आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar