मुंबईत सध्या एका विचित्र आजाराने थैमान घातले आहे. सामान्य ताप हे या आजाराचे प्राथमिक लक्षण आहे. हा आजार अल्पावधीतच मोठ्या संख्येने लोकांना जडत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, मलेरिया, चिकुनगुनिया आणि इतर संसर्गासाठी रुग्णांची ज्या प्रकारे तपासणी केली जाते. तसेच या आजारासाठीही तशीच तपासणी केली जात आहे. BYL नायरच्या डॉक्टरांनी TOI ला सांगितले की तापासह पुरळ हे अनेकदा डेंग्यू दर्शवतात, परंतु जेव्हा डेंग्यूची चाचणी केली जाते तेव्हा अहवाल नकारात्मक येतो. दोन महिन्यांपासून हा विचित्र ताप दिसू लागला आहे.
या रोगाची लक्षणे –
असामान्य ताप, शरीराचे तापमान 99 ते 102 डिग्री दरम्यान जाते. 4 किंवा 5 व्या दिवशी शरीरावर पुरळ येतात. डोळ्यात जडपणा येतो. सतत डोकेदुखी जाणवते. झोप येत नाही. अस्वस्थता जाणवते. सांध्यांमध्ये तीव्र वेदना जाणवते.
TOI शी बोलताना डॉ. नीलम आंद्राडे म्हणाल्या, तापासोबतच पुरळ चौथ्या किंवा पाचव्या दिवशी शरीरावर दिसू लागतात. साधारणपणे हे पुरळ शरीरावर एक ते दोन दिवसच दिसतात. या काळात व्यक्तीला सांधेदुखीचा अनुभव येतो. आणखी एक डॉक्टर, डॉ प्रतित समदानी म्हणाले की, विषाणूजन्य ताप आणि इन्फ्लूएंझा कालांतराने वेगळ्या पद्धतीने जाणवतात.
संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ.वसंत नागवेकर म्हणाले की, डेंग्यू 2 आणि डेंग्यू 4 सेरोटाइपचे अनेकदा सुरुवातीला नकारात्मक परिणाम दिसून येतात. चिकनगुनिया चाचणी देखील पहिल्या सात दिवसात नकारात्मक येते.
हे टाळण्यासाठी काय करावे?
आतापर्यंत या विचित्र आजाराबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत तुम्ही एक गोष्ट करू शकता. आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या. तसेच भरपूर पाणी प्या. जेणेकरून तुमची प्रतिकारशक्ती चांगली राहील.
The post मुंबईत पसरतोय हा विचित्र आजार; लक्षणे – ताप, अस्वस्थता, डोकेदुखी.. appeared first on Dainik Prabhat.