Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

मिक्सर ब्लेडला धार करायची असेल, तर घरी बसून वापरा ‘या’ युक्त्या !

by प्रभात वृत्तसेवा
July 22, 2022
in लाईफस्टाईल
A A
मिक्सर ब्लेडला धार करायची असेल, तर घरी बसून वापरा ‘या’ युक्त्या !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पूर्वी भारतात, मसाले किंवा भाज्या इ. बारीक करण्यासाठी खलबत्त्याचा किंवा पाटा वरवंट्याचा वापर केला जात असे. स्त्रिया कोणत्याही प्रकारचे कोरडे मसाले दगडाच्या खलबत्त्यात वाटत असत, तर चटणी वगैरे बनवण्यासाठी कोथिंबीर, मिरच्या यांसारख्या भाज्याही त्यावर कुटल्या जात. आता देखील अनेक घरांमध्ये खलबत्ता तसेच पाटा वरवंट्याचा वापर केला जातो. पण गेल्या काही वर्षांपासून भारतीय स्वयंपाकघरातील काम सोपे करण्यासाठी अनेक प्रकारची उपकरणे आली आहेत.

मायक्रोवेव्ह, इंडक्शन, इलेक्ट्रिक केटल, ज्युसर आणि मिक्सर ग्राइंडर इत्यादी स्वयंपाकघरातील उपकरणांद्वारे स्वयंपाक करताना बरेच काम कमी वेळेत सहज होते. उदाहरणार्थ, मसाले किंवा भाज्या बारीक करण्यासाठी आणि रस तयार करण्यासाठी मिक्सरचा वापर केला जात आहे. मिक्सरमधील ब्लेडने भाज्या आणि मसाले बारीक वाटून होतात. मात्र, जेव्हा मिक्सरची ब्लेडची धार कमी होऊ लागते, तेव्हा मसाले वाटण्यात अडचण येते. मिक्सरची ब्लेड एज किंवा धार वाढवण्यासाठी लोक बाजारात जातात. पण जर तुम्हाला घरीच मिक्सर ब्लेडची धार वाढवायची असेल, तर यासाठी काही सोप्या टिप्सचा अवलंब करू शकता. घरच्या घरी मिक्सर ब्लेड्स सहजपणे तीक्ष्ण करण्यासाठी तुम्हाला फक्त 10 मिनिटे लागतील.

* मिक्सर ग्राइंडरचे ब्लेड शार्पनिंग कसे वाढवायचे?

. स्टेप 1- मिक्सर ब्लेडची धार तीक्ष्ण करण्यासाठी सॅंडपेपर वापरा. सँडपेपर कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानात 10-20 रुपयांना सहज उपलब्ध असते. यामुळे इजा होण्याचा धोकाही कमी असतो.

. स्टेप 2- सर्वप्रथम मिक्सर ग्राइंडरमधून ब्लेड उघडून बाहेर काढा.

. स्टेप 3- आता ब्लेड सँडपेपरने घासून घ्या.

. स्टेप 4- या दरम्यान ब्लेडवर पाण्याचे थेंब सतत टाकत रहा.

. स्टेप 5- ब्लेडला पाच ते आठ मिनिटे सतत घासत राहा.

टीप- ब्लेड घासण्यासाठी तुम्ही सँडपेपर सपाट जागेवर ठेवून त्यावर ब्लेड घासू शकता. अशा प्रकारे ब्लेडची धार सहजपणे तीक्ष्ण केली जाईल.

* इतर मार्गांनी ब्लेड धारदार करणे
जर तुम्हाला सॅंडपेपर वापरायचा नसेल तर तुम्ही प्युमिस स्टोन, ऍल्युमिनियम फॉइल किंवा लोखंडी रॉड देखील वापरू शकता.

ब्लेडची धार वाढविण्यासाठी साधा दगड देखील वापरला जाऊ शकतो.

* या गोष्टी लक्षात ठेवा
. तुम्ही मिक्सर ब्लेडला सॅंडपेपरने धार करत असाल किंवा इतर कोणत्याही प्रकारे, तर तुमच्या हातात हातमोजे नक्की घाला.

. ब्लेडची धार वाढवण्यासाठी तुम्ही जे पाणी वापरत आहात, ते गरम असल्यास चांगले होईल. आपण पाण्यात दोन चमचे मीठ घालू शकता.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar