त्वचेवर वापरले जाणारे वेगवेगळे मास्क योग्य की अयोग्य? काय आहे नक्की मास्क थेरपी? आपण स्किन केअर ब्युटी पार्लर अथवा सलोनमध्ये त्वचेवर फेशियल, क्लीन अप अथवा मास्क थेरपी करून घेतो. आपण कधी जागरूकतेने मास्क थेरपी जाणून घेतो का? आजूबाजूला बाजारामध्ये अनेक पद्धतीचे मास्क उपलब्ध असतात. यामध्ये क्रीम मास्क, पावडर मास्क, पिलऑफ मास्क, शीट मास्क, ऑइल मास्क, थरमोहर्ब मास्क, लाईट थेरपी मास्क, जेल मास्क, हैड्रामास्क, हॉट मास्क, लिड लाईट मास्क, चारकोल मास्क, कॉलेजन शीट मास्क, डी ट्यान मास्क असे अनेक प्रकारचे मास्क बघायला मिळतात, अथवा दैनंदिन जीवनात स्किन केअरमध्ये अथवा ब्युटी पार्लर्समध्ये पण सुचवण्यात येतात. यासंदर्भात माहिती जाणून घेऊ.
त्वचा परीक्षणात सौंदर्यशास्त्रानुसार त्वचेवर लावले जाणारे मास्कचे मुख्यतः प्रमुख दोन प्रकार पडतात. सेटिंग मास्क आणि नॉन सेटिंग मास्क. प्रामुख्याने त्वचा प्रकारानुसार, वयोमानानुसार आपल्याला गरज भासत असते. महिला फेशियल करतात तेव्हा त्यामधील महत्त्वाचा घटक त्या फेशियलचा मास्क असतो. जसे आपण एखादा पदार्थ केल्यानंतर तो डब्यात भरून तो सुरक्षित राहण्यासाठी योग्य काळजी घेतो आणि मगच त्या डब्याचे झाकण लावतो. चेहऱ्याच्या त्वचेवरील फेशियल ट्रीटमेंटनंतर मास्क हा महत्त्वाचं काम करत असतो. त्यामुळे त्वचेवर मास्क लावत असताना त्वचेच्या योग्यतेनुसार तो लागणे फार महत्त्वाचे असते. सिबोरीक, प्रॉब्लेमॅटिक, क्रस्टी, ऍकने पिंपलयुक्त ऑइली, पॅच असलेली काळवंडलेली अशा त्वचेसाठी सेटिंग मास्क उपयुक्त ठरतो.
तर ड्राय शुष्क, थोडीशी खरबडीत अथवा ओघळलेली तसेच प्रौढ मॅच्युअर, रिंकलयुक्त अशा त्वचेसाठी नॉन सेटिंग मास्क उपयुक्त ठरतो. फळे, वनस्पती, सर्व प्रकारचे हशीली, नैसर्गिक घटक, समुद्री वनस्पती अशा जैविक घटकांपासून नॉन सेटिंग मास्क बनवलेला असल्याने याचा त्वचेच्या आतील थरातील भागांना पण फायदा होतो. त्वचेवर होणारा परिणाम- पेशींची कार्यक्षमता वाढवते, त्वचेची श्वसनक्षमता वाढवते. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा चांगला होतो. फळे आणि वनस्पती त्वचेच्या पीएचला स्थिरता देतो. त्वचेतील पाण्याची पातळी समतोल करतो. त्वचेला ओलावा देतो. पेशींचे पुनर्जीवन होते. सुधींग इफेक्ट मिळतो. वनस्पती आणि हर्बस.. पेशींना पुनर्जीवन मिळते. ओलावा मिळतो. त्वचेचा रंग एकसारखा होण्यास मदत होते. उजळपणा मिळतो. सहज त्वचेला पचतो.
यातील नैसर्गिक घटक अंडी, दही, मध आणि ओटमिल (मैदा), कॉर्नफ्लावर (मका पीठ). त्यांचे परिणाम… ऍव्हा कॅडो/ नासपती… यामध्ये असणारे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स तसेच नैसर्गिक तेल यामुळे कोरड्या, वयस्कर आणि संवेदनशील त्वचेसाठी चांगले असते. अंड्यातील पांढरा भाग त्वचेला टायटनिंग इफेक्ट देतो. ब्लॅकहेड्स आणि इतर दूषित काढून टाकण्यास मदत करतो. यंग आणि तेलकट त्वचेसाठी चांगले. लिंबाचा रस टाकल्यास रिफाइन ऍक्शन वाढते. तसेच ओपन पोअर्स चांगल्या प्रकारे रिफाइन होतात.
अंड्यातील बलक (पिवळा भाग)… त्वचेला पोषण देतो. कोरड्या त्वचेसाठी चांगला. मध… दूषित काढण्यासाठी, मृत त्वचेचा श्रर काढण्यासाठी त्वचेला उजळपणा देतो. त्वचेला ओलावा देतो. सुरकुत्यांपासुन बचाव करतो. सर्व प्रकारच्या स्किनसाठी आहे. ओटमील… नैसर्गिकरित्या मृत त्वचा काढण्यासाठी चांगले. केळी… पोटॅशिअम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन कोरड्या संवेदनशील त्वचेसाठी चांगले असते. काकडी… त्वचेला थंडावा देते. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त. स्ट्रॉबेरी… ऍसिड रिऍक्शन होते. अंड्यातील पांढरा भाग मिक्स करुन ऍसिड रिऍक्शन कमी करू शकतो. पीएच बॅलन्स होऊन ओलावा वाढवतो. लिंबाचा रस… तेलकट त्वचेला कोरडी करतो. समुद्री पॅक… त्वचेला ओलावा देतो. स्किनफूड सप्लाय करतो. हर्ब आयुर्वेदिक वनस्पती स्टिम्युलेशन तसेच टोन सुधारतो.
सेटिंग मास्कमधील प्रमुख घटक क्ले मास्क… हा सर्वात जास्त वापरला जाणारा मास्क आहे. कमी खर्चामध्ये मिळणारा. यामधे तेल शोषले जाऊन त्वचेचा भाग स्वच्छ होऊन रंग उजळतो. या मास्कचा चांगला रिझल्ट येण्यासाठी तो वेगवेगळ्या गोष्टींमधे टाकून वापरतात. मुलतानी माती… लालसरपणा येतो. खोलवर त्वचेची स्वच्छता नैसर्गिकरित्या मृत त्वचा काढणे. त्वचेला उजळपणा देतो. तेलकट त्वचेसाठी चांगला. संवेदनशील त्वचेला वापरू नये. केओलिन… खोलवर त्वचेची स्वच्छता, त्वचेतील दूषित काढून टाकणे. नैसर्गिकरित्या मृत त्वचा काढून टाकण, ब्लड सर्क्युलेशन व लिंफ सर्क्युलेशन वाढवतो. त्वचेची कार्यक्षमता वाढवतो. स्किन टाइटनिंग इफेक्ट देतो. ऑइली, क्रस्टी त्वचेसाठी चांगला. मॅग्नेशियम कार्बोनेट.. सौम्यपणे उत्तेजित करते. त्वचेला चांगली बनवते,
त्वचेला मऊ बनवते, त्वचा स्वच्छ करते. कॅलामाईन… मऊ बनवते. त्वचा स्वच्छ करते. नसांना उत्तेजित करते. जळजळ थांबवते. संवेजनशील त्वचेसाठी चांगले. गुलाब जल तसेच मोसंबीचे पाणी… हलके उत्तेजित करते. वयस्कर, कोरडी तसेच संवेदनशील त्वचेसाठी चांगले. ऍस्ट्रिन्जेंट… उत्तेजित करते, कोरडेपणा देते, त्वचाछिद्र स्वच्छ करते. तेलकट त्वचेसाठी चांगले. अँटिबॅक्टेरियल इफेक्ट मिळतो. ग्लिसरीन… सुधींग इफेक्ट देते. पाण्याच्या कमतरतेला भरून काढते. यात धरून ठेवण्याची क्षमता असल्यामुळे मास्कला मऊ ठेवण्यास मदत होते.
The post मास्क थेरपी : त्वचेवर वापरले जाणारे वेगवेगळे मास्क योग्य की अयोग्य? appeared first on Dainik Prabhat.