Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

“मायग्रेन’ नावाची डोकेदुखी आणि आयुर्वेद – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
October 26, 2021
in आरोग्य वार्ता
A A
“मायग्रेन’ नावाची डोकेदुखी आणि आयुर्वेद – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

सध्या ज्या विकारात दिवसेंदिवस आयुर्वेदिय उपचार उत्तम लाभदायक आणि सुरक्षित असल्याचे अनुभवास येत आहे, असा विकार म्हणजे “मायग्रेन’. यालाच व्यवहारात “अर्धाशिशी’ अथवा माथा उठणे असेही म्हटले जाते. ज्या विकारात वारंवार कमी अधिक प्रमाणात साधारणपणे अर्धे डोके दुखणे आणि याचबरोबर मळमळ, अन्नाची इच्छा नसणे, काही वेळा उलट्या आणि चिडचिडेपणा असा त्रास होतो. त्या डोकेदु:खीला “मायग्रेन’ असे म्हटले जाते.

विकाराचे स्वरूप
साधारणपणे वयात येणाऱ्या काळात उत्पन्न होणारी ही डोकेदुखी अधूनमधून त्रास देत असते. महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळणाऱ्या या विकारात काही वेळा अनुवंशिकतादेखील आढळून येते. काही वेळा या विकाराचा संबंध मासिक पाळीशी असल्याचे आढळते. तसेच पाळी बंद होतानाच्या काळात म्हणजेच “मेनोपॉज’मध्ये ही डोकेदुखी तीव्र झाल्याचे आढळते.

मायग्रेनची कारणे
विविध कारणांनी डोक्‍याकडील शिरांचे आकुंचन प्रसारणात बिघाड झाल्याने हा विकार उत्पन्न होत असतो. सतत उपास करणे, तीव्र उन्हात अथवा प्रकाशात काम करणे, अतितिखट, मसालेदार पदार्थांचे सेवन, चहा, कॉफी, मद्यपान, आंबट फळे, आंबवलेले पदार्थ यामुळे वाढलेले पित्त हा विकार उत्पन्न करण्यास कारणीभूत होते. मासिक पाळीतील अनियमितपणा,
हार्मोन्समधील असंतुलन, भीती, चिंता, काळजी यामुळे वाढणारा मानसिक तणाव ही कारणे देखील विकाराला वाढवत असतात. काहीही न खाता पोट अधिक काळ रिकामे ठेवल्याने विकार वाढल्याचे आढळते.

मायग्रेनची लक्षणे
या विकाराचे ठराविक काळाने ऍटॅक येतात. त्रास सुरू होण्यापूर्वी अतिउत्साह अथवा अतिनैराश्‍य जाणवते. कंटाळा, जांभया येणे हे त्रास जाणवतात. कालांतराने डोळ्यापुढे काजवे चमकल्याप्रमाणे विविध आकार दिसणे, अंधारी, डोळ्यात अस्वस्थता जाणवून काही वेळातच डोके दुखण्यास सुरू होते. साधारणपणे अर्धे डोके दुखणे, असे स्वरूप असले तरी नंतर संपूर्ण डोके दुखते. डोके जड होणे, ठणकणे, तीव्र वेदना, डोक्‍याची शिर उडणे तसेच मरगळ, अन्नाची इच्छा नसणे, मळमळ, उलट्या, प्रकाश सहन न होणे हा त्रास होत असतो. उलट्या झाल्यावर काही वेळा हा त्रास लगेच कमी होतो, तर काही रुग्णात तो तसाच रहातो. या दरम्यान चिडचिडेपणा, अस्वस्था वाढलेली असते. काही महिलांत पूर्वलक्षणे न जाणवता फक्‍त डोकेदुखी वाढल्याचे आढळते.

मायग्रेनवरील आयुर्वेदिक उपचार
मायग्रेनचा त्रास होणाऱ्या रुग्णांना अनेकवेळा त्रास सुरू झाल्यावर तात्पुरती रासायनिक वेदनाशामक गोळी घेण्याची सवय जडलेली असते. यामुळे आराम मिळत असला तरी अनेकदा या औषधाचे दुष्परिणामही होऊ शकतात. उलट्यांमुळे आलेला अशक्‍तपणा, हार्मोनमधील असंतुलन यांचा उपचार होत नसतो.

मायग्रेनच्या रुग्णांनी घ्यावयाची काळजी
आयुर्वेदिक उपचार सुरू करताना रुग्णाचे वय, व्यवसाय, आहार, व्यसने, शारीरिक ताण, मानसिक तणाव, मासिक पाळीचे स्वरूप, जागरण, उन्हाशी संपर्क इत्यादी सखोल माहिती घेऊन त्यानंतर पंचकर्म व औषधे आणि पथ्यपालन या त्रिसुत्रीने उपचार केले जातात.
औषधी तेलाने डोक्‍याला मसाज, शिरोधारा, नस्य, सर्वांग स्नेहन, विरेचन, बस्ती यापैकी पंचकर्मांचा गरजेप्रमाणे उपयोग करावा लागतो.

याचबरोबर आवळा, भुनिंब, वासा, गुडूची, पटोल, जेष्ठमध, निर्गुंडी, गुग्गुळ, दशमुळ, अश्‍वगंधा, जटामांसी, ब्राह्मी तसेच अभ्रकभस्म, माक्षीक भस्म, शंख, मौक्तिक, प्रवाळ, गोदंती इत्यादीपासून केलेली विविध संयुक्‍त औषधे नियमितपणे घ्यावी लागतात. दीर्घकाळ औषधे घेण्याची चिकाटी ठेवल्यास तसेच विशिष्ट अशी काळजी नियमित घेतल्यास या विकारावर उत्तम नियंत्रण मिळवता येते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar