[[{“value”:”
Madhuri Dixit | hair mask – आजच्या काळात कमी वयातच केस कमजोर, कोरडे आणि गळू लागतात. प्रत्येक महिलेला दाट, मऊ आणि चमकदार केस हवे असतात, पण बदलत्या हवामानाचा परिणाम केसांवरही दिसून येतो.
पावसाळ्यात केस गुंततात, उन्हाळ्यात कोरडे होतात आणि हिवाळ्यात आपली नैसर्गिक चमक हरवतात. त्यात आपण वापरत असलेले केमिकलयुक्त शॅम्पू आणि कंडिशनर केसांचे आणखी नुकसान करतात. त्यामुळे नैसर्गिक उपाय हेच सर्वात सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात.
बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’ माधुरी दीक्षित हिने नुकताच आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर करत केसांच्या सौंदर्याचं गुपित सांगितलं आहे. तिने सांगितलेला हेअर मास्क पूर्णपणे घरगुती आणि केमिकल-फ्री आहे. या मास्कसाठी लागणारे घटक आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात सहज मिळतात.
माधुरीचा नैसर्गिक हेअर मास्क :
१. केळं : बहुतेक वेळा जास्त पिकलेलं केळी फेकून दिलं जातं, पण तेच केळं केसांसाठी अमृतासमान असतं. केळीमधील नैसर्गिक तेल आणि पोटॅशियम केसांना आतून ओलावा देतात. यामुळे कोरडे आणि निस्तेज केस मऊ होतात व त्यांना पुन्हा चमक येते. माधुरीच्या मते, केळं केसांना गुंत्याशिवाय विंचरायला सोपं करतं आणि नियमित वापराने केस तुटणं कमी होतं.
२. दही : दही हे केसांसाठी एक नैसर्गिक कंडिशनर मानलं जातं. त्यात असलेलं लॅक्टिक अॅसिड स्कॅल्पवरील मृत पेशी काढून टाकतं आणि नवीन पेशींच्या वाढीस चालना देतं. दही केसांच्या मुळांना पोषण देतं आणि केसगळती कमी करतं.
३. मध : मधातील अँटिऑक्सिडंट्स केसांना नैसर्गिक संरक्षण देतात. हे स्कॅल्पवरील जंतू आणि बुरशीजन्य संसर्ग कमी करून डोकं स्वच्छ ठेवतात. माधुरीच्या म्हणण्यानुसार, मध केसांना नैसर्गिक चमक देते, कोरडेपणा कमी करते आणि मुळापासून टोकापर्यंत ओलावा टिकवतो.
‘हा’ मास्क कसा तयार करावा?
– एका वाटीत एक पिकलेलं केळं मॅश करा.
– त्यात दोन मोठे चमचे दही आणि एक मोठा चमचा मध घाला.
– सर्व घटक एकत्र करून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
– ही पेस्ट केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा आणि ३०-४० मिनिटं ठेवून द्या.
– त्यानंतर सौम्य हर्बल शॅम्पूने केस धुवा.
आठवड्यातून एकदा हा मास्क लावल्यास काही आठवड्यांतच फरक स्पष्ट दिसेल केस होतील मऊ, दाट आणि नैसर्गिक तेजाने झळकतील.
The post माधुरी दीक्षितचा घरगुती हेअर मास्क ठरतोय जादूई! कोरडे आणि कमकुवत केस होणार रेशमी व चमकदार appeared first on Dainik Prabhat.
“}]]
