Friday, October 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

माणसांच्या तळहातावर आणि तळपायावर केस का नसतात? – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
July 9, 2022
in लाईफस्टाईल
A A
माणसांच्या तळहातावर आणि तळपायावर केस का नसतात? – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

तुम्ही अनेक प्राणी पाहिले असतील की त्यांच्या तळहातावर आणि पायाच्या तळव्याला केस असतात, परंतु माणसांच्या तळहातावर आणि तळव्याला केस कधीच उगवत नाहीत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की शरीराच्या इतर भागावर केस का वाढतात, पण तळहात आणि तळव्यावर का वाढत नाहीत? त्यामागचे कारण काय? चला, यामागचे कारण जाणून घेऊया.

एका सायन्स वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, जगभरातील शास्त्रज्ञांसाठी हे फार पूर्वीपासून एक रहस्य बनून राहिले होते. पण 2018 मध्ये एका अभ्यासात हे रहस्य उघड झाले. तळहात आणि तळवे यांच्यावर केस का उगवत नाहीत याचे रहस्य शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. याचे शास्त्रीय कारण काय आहे? युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाच्या स्किन एक्सपर्ट सारा मिलर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

* जाणून घ्या केस का वाढतात ?
सारा मिलरने एका वेबसाइटला सांगितले की, केसांवर खूप संशोधन झाले आहे. त्यांनी हे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की शरीरात Wnt नावाचा एक प्रकारचे प्रोटीन किंवा प्रथिनं असते. हे प्रथिनं एक संदेशवाहक म्हणून कार्य करते. केसांची वाढ, जागा आणि पेशींमधील वाढ याबद्दल माहिती देते. केसांच्या वाढीसाठी या प्रोटीनला मिळणारे सिग्नल आवश्यक असतात.

सारा म्हणते की आपल्या शरीराच्या ज्या भागांमध्ये नैसर्गिकरित्या केस वाढत नाहीत, त्यांच्यामध्ये इनहिबिटर असतात जे प्रथिनांना त्यांचे काम करू देत नाहीत. इनहिबिटर देखील Dickkopf 2 (DKK2) नावाचा एक प्रकारचा प्रोटीन आहे. हे जाणून घेण्यासाठी उंदरांवर संशोधन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनी नोंदवले की जेव्हा उंदरांमधून Dickkopf 2 प्रथिने काढली गेली तेव्हा त्यांच्या तळहातावर जिथे केस नसतात, तिथेही येऊ लागले. यानंतर सशावर प्रयोग करण्यात आला. सशांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की त्यांच्या शरीरात हे प्रथिन फार कमी प्रमाणात आढळते, त्यामुळे त्यांच्या हातावर आणि पायावर जास्त केस वाढतात. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की हे प्रोटीन का असते?

तथापि, या प्रथिनांच्या उपस्थितीचे कारण काय आहे हे शास्त्रज्ञ अद्याप शोधू शकलेले नाहीत. त्यांनी स्पष्ट केले की जैव उत्क्रांतीमुळे, हे प्रथिने जीवांमध्ये आढळतात.

ते म्हणाले की, अस्वल आणि ससे यांसारखे प्राणी खडकाळ आणि दुर्गम रस्त्यावर चालतात, त्यामुळे त्यांच्या हातावर आणि पायावर केस वाढतात. माणसांच्या हातावर आणि तळव्यावर केस उगवले तर समस्या वाढतील.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar