Saturday, August 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

‘माझ्या गालावर पडते खळी, नाक माझं बाई चाफेकळी…’गालावरची खळी सांगते आयुष्यातील अनेक रहस्ये

by प्रभात वृत्तसेवा
June 11, 2021
in लाईफस्टाईल
A A
‘माझ्या गालावर पडते खळी, नाक माझं बाई चाफेकळी…’गालावरची खळी सांगते आयुष्यातील अनेक रहस्ये
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

सौंदर्याची परिभाषा गालावरची “खळी’ या एका शब्दात मांडता येते. सौंदर्य मापनाचे ते एक परिमाण आहे. गालावर खळी असेलेले स्त्री-पुरुष आकर्षक दिसतात. कारण स्मित हास्य करताच समोरच्याची दृष्टी गालावरच्या खळीवर खिळून राहते. बघणाऱ्यांचे भान हरपते. अशी काय जादू असते या खळीमध्ये?

लहान मुले-मुली या खळीत किती निरागस दिसतात. तरुण-तरुणीच्या गालावरील खळी लोभस वाटते. अनेक सिलेब्रिटींच्या गालावर खळी असल्याने ते उजवे ठरतात. शाहरूख खानच्या गालावरील खळीला तोड नाही, तर प्रीती झिंटाच्या गालावरील खळीला शब्द नाही.

शाहरूखचा हसरा चेहरा मनमोहक दिसतो, तर प्रीतीच्या चेहऱ्यावरून नजर हटत नाही. दीपिका पादुकोन आणि आलिया भट्टचे सौंदर्यही त्यांच्या गालावरच्या खळीत खळखळून हसते. शाळा, कॉलेजमधील काही तरुणी पुढील आयुष्यातही कायम स्वरूपी अनेकांच्या लक्षात राहतात, ते त्यांच्या गालावर पडणाऱ्या खळीवरून.

अनेक तरुणींची तर खळी हीच तिची ओळख बनते. मित्रांच्या गप्पांच्या मैफलीत तिचा उल्लेख “गालावर खळी पडते ती पोरगी’ असाच येतो. लग्न करताना अनेक मुले गालावर खळी पडत असलेल्या मुलीच्या शोधात असतात.

तर ज्यांच्या बायकोच्या गालावर खळी पडते असे नवरोबा अगदी चारचौघांत त्याच्या बायकोला असे काही मिरवतात की, सोबत ताजमहलच मिरवत आहेत. असो, आपल्या गालावर खळी पडत नसली तर दु:खी होण्याचे कारण नाही. कारण समोरच्या गालावरील खळी पाहूनही आपल्याला आनंद होतो, त्यातच समाधान मानावे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar