Thursday, December 11, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

माकड हाडाचे दुखणे… – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
December 1, 2021
in आरोग्य वार्ता
A A
माकड हाडाचे दुखणे… – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. बाविशीच्या दरम्यानची एक नवविवाहिता तिच्या कंबरेच्या दुखण्यावर होमिओपॅथिक उपचार करून घेण्याकरिता क्‍लिनिकमध्ये आली होती. तिला दैनंदिन कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत होते. त्यातच आता थोडी नवीन जबाबदारी तिच्या अंगावर पडली होती. या सगळ्या व्यापामध्ये तिला कंबरदुखीचा त्रास सुरू झाला होता.

तिने कथन केलेल्या तिच्या तक्रारीनुसार तिने करून घेतलेला एक्‍स-रे अभ्यासून तिच्यावर केलेल्या पोश्‍चर थेरपीमुळे तिचे दुखणे बरेचसे कमी झाल्याचे तिने सांगितले. पुढे तिला कोणताच त्रास जाणवला नाही हेही तिने कथन केले. ही गोष्ट तीन-चार वर्षापूर्वीची असली तरी पहिल्या बाळंतपणात मात्र तिला पुन्हा तोच त्रास थोड्या प्रमाणात जाणवू लागला होता असे ती म्हणत होती. दुखण्याचा जोर कमी-अधिक असल्याने थोडे दुर्लक्ष झाल्याचे ती पुढे म्हणाली.

महिन्याभरापूर्वी मात्र घरात पाण्यावरून पाय घसरल्याचे निमित्त झाले आणि तिच्या दुखण्याचा जोर चांगलाच वाढला. घरातील दैनंदिन कामे करणेसुद्धा नकोसे होऊ लागले. पंधरा मिनिटे उभे राहून काम करणेदेखील जिवावर आल्यासारखे तिला वाटत होते. लहान मुलाबरोबर खेळणे तर दूर पण त्याचे आवरून देणेदेखील तिच्याने जमेना.

यादरम्यान, निरनिराळ्या तपासण्या करून वेगवेगळ्या उपचार पद्धतीने उपचार करून थोडासा आराम मिळत होता. एक दिवस घरीच व्यायाम करताना काही तरी चूक झाली आणि दुखण्याचा जोर फारच वाढला. पुन्हा एकदा पोश्‍चर थेरपीची आठवण येऊन उपचाराकरीता ती क्‍लिनिकमध्ये आली होती.

सूक्ष्म निरीक्षण करताना तिच्या प्रत्येक हालचालीमध्ये तिला बसण्यास खूपच त्रास होत असल्याचे आढळून आले. क्‍लिनिकमधील 10 ते 15 मिनिटांच्या भेटीत ती तिची बसण्याची पद्धत सतत बदलत होती. बसलेल्या स्थितीत माकड हाड खूप जास्त दुखत असल्याचे तिच्या सांगण्यावरून कळाले. बसल्यावर मांडीला मागच्या बाजूने गुडघ्यापर्यंत वेदना होत आहेत, असेही ती म्हणाली.

कोणत्याच स्थितीमध्ये जास्त वेळ उभे राहणे किंवा बसणे तिला अशक्‍यप्राय वाटत होते. घरातील रोजच्या कामासाठी सकाळच्या वेळेत सलग उभे राहून सर्व कामे सलग करता येणे जमतच नव्हते. प्रत्येक 10-15 मिनिटांनी गादीवर जाऊन आराम करणे आणि पुन्हा कामासाठी उभे राहणे अशी तिची दिनचर्याच झाली होती. तिच्या या दुखण्याचे कारण तिने बरोबर आणलेल्या एक्‍स्‌ रे आणि एमआरआयमधून व्यवस्थित समजून येत होते.

रोजच्या हालचालीमुळे तसेच कामाच्या व्यापात चुकीच्या पद्धतीमध्ये हालचाली होत राहिल्याने तिचा मणका उजव्या बाजूस सरकण्यास सुरुवात झालेली होती. माकड हाडाला असणारी नैसर्गिक गोलाई काहीशा प्रमाणात वाढली होती. परिणामी बसल्यावर माकड हाडाच्या टोकावर नेहमीपेक्षा जास्त दाब आल्याने तिच्या दुखण्याची तीव्रता वाढत होती.

आपल्या प्रत्येकाच्या पाठीचा मणका म्हणजे एक चवड आहे. ही चवड म्हणजेच आपल्या शरीर रचनेचा पाया आहे. कोणत्याही इमारतीचा पाया ढळला तर इमारतीमध्ये ज्याप्रमाणे बिघाड येण्यास सुरुवात होते. अगदी त्याचप्रमाणे आपल्या शरीराचा पाया हलला तर पूर्ण मणक्‍याच्या रचनेमध्ये बिघाड येण्यास सुरुवात होते. अशा वेळी मणक्‍यातून जाणारी नस दबून त्याचा परिणाम म्हणून निरनिराळ्या शारीरिक तक्रारी उद्‌भवतात. काही वेळा दोन मणक्‍यात असलेली गादीही अल्पशा प्रमाणात सरकण्यास सुरुवात होते.

अशा प्रकारची तक्रार होण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे एखादा कंबरेवर विशेषत: माकड हाडावर होणार जोराचा आघात. क्वचितप्रसंगी घरात, बाथरूममध्ये जोरात पाय घसरून पडणे, अशा किरकोळ वाटणाऱ्या घटना, ते एखाद्या मोठ्या अपघातापर्यंत काहीही कारण असू शकते. अशा प्रकारे पडल्याने माकड हाडाच्या आजूबाजूस असणाऱ्या लीगामेंट्‌स आणि स्नायूंना धक्‍का बसतो. शरीरातील हाडांची नैसर्गिक जागा बदलू शकते. तर कधी फ्रॅक्‍चरदेखील होण्याची शक्‍यता असते. कित्येक वेळा सततचा लांबचा प्रवाससुद्धा माकड हाडाच्या दुखण्याला कारणीभूत ठरतो. अशा वेळी प्रवासामध्ये किंवा प्रवासानंतर दुखणे सुरू झाल्यास वेळीच काळजी घेणे आवश्‍यक असते. अन्यथा त्याचे दूरगामी परिमाण दिसून येतात.

गरोदर स्त्रियांमध्ये बाळाच्या वाढीच्या दरम्यान गर्भाच्या डोक्‍याचा भार सतत माकड हाडावर येत राहिल्यास अशा प्रकारची तक्रार संभवते. काहीच्या बाबतीत एखादी गाठ किंवा या भागात झालेला संसर्ग देखील माकड हाडाच्या दुखण्यास कारणीभूत असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कमरेच्या मणक्‍यातील गादी सरकल्याने त्याचा दाब माकड हाडावर येऊन दुखणे सुरू होऊ शकते.

याशिवाय एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही कारणामुळे वाढणाऱ्या शरीराच्या वजनामुळे माकड हाडावर दाब पडतो आणि दुखणे पाठीमागे लागते. वरील प्रकारच्या तक्रारी उद्‌भवू नयेत या करीता योग्य ती खबरदारी घेणे हितकारक असते. आपली प्रत्येकाची बसण्याची पद्धत योग्यच असावी.

एकाच जागी जास्त वेळ बसून काम करायचे असल्यास कडक पृष्ठभागावर बसू नये. मधूनमधून उठून थोडी हालचाल करायला हवी. यामुळे आपल्या तक्रारीचे योग्य निवारण करणे शक्‍य होते. अर्थात, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन योग्य उपचार करणे हीदेखील महत्त्वाचे आहे.

या प्रसंगात उल्लेख केलेल्या तरुणीकरिता योग्य पद्धतीने पोश्‍चरल करेक्‍शन थेरपी द्वारे उपचार सुरू केल्यावर लगेचच म्हणजे सुरुवातीच्या काही तासांतच तिच्या दुखण्याची तीव्रता कमी झाली होती. पूर्ण बरे होण्यास तिला पुढील काही दिवस आणखी उपचार करून घेणे आवश्‍यक आहे हेही खरे आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar