वॉशिंग्टन – चालण्याचा व्यायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते हे आज मान्य झाले आहे आता एका नवीन संशोधनाप्रमाणे महिलांनी जर जलद चालण्याचा व्यायाम केला तर त्यांच्यातील हृदयविकाराचा धोका तब्बल 34 टक्क्यांनी कमी होतो सावकाश चालण्याचा व्यायाम करणाऱ्या महिलांपेक्षा जलद चालण्याचा व्यायाम करणाऱ्या महिलांना या व्यायामाचा अधिक फायदा होतो असे या संशोधनात म्हटले आहे
अमेरिकेच्या ब्राऊन युनिव्हर्सिटीने याबाबतचे संशोधन केले असून त्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे 50 ते 70 या वयोगटातील महिलांच्या अभ्यासानंतर या युनिव्हर्सिटीने हा संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे या संशोधनात एकूण 25183 महिलांचा अभ्यास करण्यात आला त्यांच्या व्यायामाची पद्धत तपासण्यात आली सतरा वर्षे याबाबतचे संशोधन सुरू होते त्यानंतर हे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहेत या 17 वर्षाच्या कालावधीमध्ये 1455 महिलांना हृदयविकाराचा अटॅक आला
ज्या महिलांचा चालण्याचा स्पीड प्रतितास 3.4 किलोमीटर होता त्यांना हृदयविकाराचा कोणताही त्रास झाला नाही 3.2 किलोमीटर वेग असणाऱ्या महिलांनाही हृदयविकाराचा धोका 27 टक्क्याने कमी झाले ज्या महिलांना हृदयविकाराचा त्रास झाला त्यांचा चालण्याचा वेग खूपच कमी असल्याचे संशोधनातून समोर आले आहे या संशोधनाचे प्रमुख डॉक्टर चार्ल्स ॲटन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे चालणे आणि हृदय विकार यांचा थेट संबंध आहे
महिला किंवा पुरुष जर जलद गतीने चालू शकत नसेल तर तो इशारा मानला जावा असेही या संशोधनात म्हटले आहे जलद चालण्यामुळे रक्तप्रवाह जलद होतो हृदयाचे कामकाजही व्यवस्थित चालु राहते असे डॉक्टर चार्ल्स यांनी म्हटले आहे या संशोधना पूर्वी काहीवर्षांपूर्वी एकूण 27 हजार महिलांवर अशा प्रकारचे संशोधन करण्यात आले होते तेव्हा ही अशाच प्रकारचा निष्कर्ष काढण्यात आला होता या नव्या संशोधनामुळे त्या जुन्या निष्कर्षाला पुष्टी मिळाली आहे चालण्याचा व्यायाम करा आणि हृदय विकाराला दूर पळावा असा संदेश हा संशोधन अहवाल देत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे
error: Content is protected !!