Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

महिलांनो…! मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप वापरण्याचा विचार करताय ? मग ही बातमी नक्की वाचा

by प्रभात वृत्तसेवा
August 18, 2021
in आरोग्य वार्ता
A A
महिलांनो…! मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप वापरण्याचा विचार करताय ? मग ही बातमी नक्की वाचा
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मुंबई – पाळी, मासिक धर्म म्हणजेच रजस्वला स्त्री. साधारण वयाच्या चौदा ते पंधराव्या वर्षी वयात आलेल्या प्रत्येक स्त्रीच्या शरीरात होणार मोठा बदल, ज्यामुळे तिला मातृत्वाचे दान मिळते. प्रत्येक धर्मात ह्या काळात स्त्रियांनी कसे वागावे ह्याचे काही ठराविक नियम ठेवलेले आहेत. मात्र या काळात महिलांनी तिच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी. याबाबत खुलेपणाने कधी कुठेच बोलले जात नाही. 

महिलांना मासिक पाळीत  पोटदुखी, अंगदुखी, मानसिक ताण, रक्तस्त्राव, वेदना या वेदना सहन कराव्या लागतात.  त्याच प्रमाणे या काळात कापड, पॅड यामुळे अ‍ॅलर्जी हा त्रास सुद्धा तितकाच सहन करावा लागतो. 

यावर आता मार्केटमध्ये  मेन्स्ट्रुअल कप उपलब्ध आहे. मात्र आजही या बाबत महिलांना सविस्तर माहिती नाही किंवा या कप बाबत अनेक समज गैरसमज सुद्धा आहेत.  

तर जाणून घेऊया मेन्स्ट्रुअल कप बाबतचे फायदे  

– योनीच्या आत ठेवण्यात येणाऱ्या या कपमध्ये रक्तस्राव शोषला जात नाही तर साठवला जातो. काही कालावधीनंतर हा कप काढून त्यात साठलेला स्रावची शौचालयात विल्हेवाट लावली जाते. 

– बारा तासापर्यंत न बदलता या कपचा वापर करणे शक्य आहे. एक कप अनेक वर्षे वापरता येत असल्याने आर्थिकदृष्टय़ा परवडते. 

– कप काढताना नीट काळजी घेणे अत्यावश्यक आहे. योग्य खबरदारी घेऊन याचा वापर केल्यास हा सोयीस्कर पर्याय ठरू शकतो.

जाणून घेऊया मेन्स्ट्रुअल कप बाबतचे तोटे

– काहीवेळा अति रक्तस्त्राव झाला तर कपमधून रक्त बाहेर पडण्याची आणि पॅंटी खराब होण्याची शक्यता असते. पण ठराविक काळानंतर कप काढून स्वच्छ करून वापरला तर कप ओव्हर फ्लो होण्याची शक्यता टाळता येते.

– मासिक पाळी संपल्यानंतर कप स्वच्छ गरम पाण्यानं धुवून किंवा गरम पाण्यात उकळून, कोरडा करून व्यवस्थित कोरड्या जागी ठेवून द्या. असे न केल्यास तुम्हाला अ‍ॅलर्जीचा  त्रास होऊ शकतो.  यामुळे  वेजाइनल इंफेक्शन होऊ शकते. 

-काही महिलांना पॅडच्या तुलनेत मासिक पाळीचा कप लावून वेदना जाणवतात. त्यांना ते घालणे अस्वस्थ वाटते. कधीकधी त्याचा योग्य वापर न केल्याने देखील वेदना होऊ शकते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar