पुणे – आपली त्वचा नितळ आणि तजेलदार असणे हे सौंदर्याचे महत्त्वाचे लक्षण आहे. त्वचा तजेलदार व नितळ राहण्यासाठी थोडी काळजी घ्यावी-
पस्नान करताना हिरव्या चणाडाळीचे पीठ व पिवळ्या चनाडाळीचे पीठ समप्रमाणात घेऊन दुधात भिजवून संपूर्ण अंगाला लावावे. चणाडाळीचे पीठ म्हणजेच बेसन दुधात कालवून लावावे.
पदूध पावडर 1 टेबल स्पून, मध 2 टेबल स्पून, 1 चिमुटभर हळद पावडर आणि अर्धे लिंबू एकत्र करून चेहरा, मानेला आणि हाताला चोळून लावावी. वाळल्यानंतर धुऊन टाकावी.
पकोळ व गोडे जिरे समप्रमाणात घेऊन दुधात पेस्ट करावी. त्यात थोडी मलई घालून चेहऱ्यावर लावून वीस मिनिटांनी धुवावे. हे मिश्रण आठवडयातून दोन वेळा लावावे.
ओली हळद व मोहरी वाटून दररोज ब्लॅकहेडस/पिंपल्स झालेल्या ठिकाणी लावावी. हळूहळू ब्लॅकहेडस कमी होतात.
ओट्सचे पीठ, चंदनाचे चूर्ण, 1 टेबल स्पून ओट व 1/4 टेबल स्पून चंदन पूड त्वचेवर चोळावी. थोडया वेळाने धुऊन टाकावे. कच्च्या बटाटयाच्या पातळ चकत्या कापून चेहऱ्यावर पसरून 12-15 मिनिटे शांत पडावे. नंतर धुऊन चेहरा टिपून घ्यावा. चेहरा मुलायम व स्निग्ध राहतो. त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी हे उपयोगी आहे.
लिंबू, अंडे एकत्र फेटून चेहऱ्यावर लावावे. वीस मिनिटांनी धुवावे.
त्वचा मृदू, मुलायम, स्निग्ध राहण्यासाठी दह्याने मसाज करावा.
त्वचेसाठी मॉइश्चरायझर अत्यंत उपयुक्त ठरते. त्वचेचा ओलावा टिकवून बाहेरील वातावरणाचा त्वचेवर परिणाम होऊ न देणे यालाच त्वचेवरील मॉइश्चरायझर टिकवणे असे म्हणतात. घरातील काही वस्तू व काही विकत आणलेल्या पदार्थापासून घरीच मॉइश्चरायझर करून त्वचेला चमक आणता येते.
The post महिलांनो नितळ तजेलदार त्वचेसाठी ‘ही’ बातमी नक्की वाचा; होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे… appeared first on Dainik Prabhat.
