Saturday, August 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

महिलांना स्तनांच्या आकाराबाबत काय समस्या उद्भवतात ? जाणून घ्या डॉक्टर काय म्हणतात…

by प्रभात वृत्तसेवा
July 19, 2021
in आरोग्य वार्ता
A A
महिलांना स्तनांच्या आकाराबाबत काय समस्या उद्भवतात ? जाणून घ्या डॉक्टर काय म्हणतात…
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

महिलांना स्तनाच्या आकाराबाबत काय समस्या उद्भवतात ? स्तनाचा आकार मोठा असेल , त्या वजनाने पाठदुखी इत्यादी समस्या उद्भवत असतील तर काय करता येतं ? यासारख्या अनेक महत्वाच्या प्रश्नाची उत्तरे  आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा विख्यात ब्रेस्ट कॅन्सर सर्जन डॉ प्रांजली गाडगीळ यांच्यासह दैनिक प्रभातने साधलेल्या विशेष संवाद मालिकेचा पाचवा भाग…

(प्रश्न क्र.1) महिलांना स्तनाच्या आकाराबाबत काय समस्या उद्भवतात ?

उत्तर – प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगळी असते . स्तनाचा हा साईझ नॉर्मल आणि हा ऍबनॉर्मल असं नसतं. पण महिलेच्या शरीराच्या मानाने स्तनाचा आकार लहान राहिला , त्याची वाढ अपूर्ण राहिली असेल तर त्याला आपण hypomastia म्हणतो. जर महिलेच्या बांध्याच्या मानाने वाढ खूप जास्त असेल तर त्याला आपण macromastia म्हणतो. खांदेदुखी मान/ पाठ दुखी / पाठीच्या कण्यावर ताण येऊन – spondylosis सारखा त्रास स्तनाच्या वजनामुळे होऊ शकतो – हे अनेकांना माहित नसतं. दोन्ही स्तनाचा आकारमान अगदी समान असायला पाहिजे असं नाही पण काही महिलांमध्ये या दोन स्तनाच्या आकारामधला फरक जास्त असतो ज्याला “Asymmetry” म्हणतो. स्तनाग्राचा म्हणजे निप्पल चा भाग आत खचलेला राहतो ज्याला ” निप्पल inversion” म्हणतो. काही आकाराच्या समस्या breastfeeding म्हणजे बाळाला स्तनपान केल्यानंतर उद्भवतात – स्तनाची ठेवण ओघळया सारखी दिसणं ज्याला ब्रेस्ट “Sagging” किंवा ptosis म्हणतो. उतार वयात व्हावे असे बदल तरुण वयात होतात. ब्रेस्ट च्या gland ची वाढ खके मध्ये होणं -ज्याला accessory breast development म्हणतात. या सर्व समस्यांसाठी उपचार करता येतात.

(प्रश्न क्र. 2) स्तनाचा आकार मोठा असेल , त्या वजनाने पाठदुखी इत्यादी समस्या उद्भवत असतील तर काय करता येतं ?

उत्तर – अशा केसेस मध्ये ” Breast Reduction Surgery” करून स्तनाचा आकार लहान करता येतो. हे ऑपेरेशन General Anesthesia देऊन केलं जातं. 2-3 दिवस हॉस्पिटल मध्ये राहावं लागतं. बहुतेक महिलांची पाठदुखी ची समस्या निघून जाते.

(प्रश्न क्र. 3) स्तनाचा आकार वाढविण्या साठी काही औषधं महिला घेऊ शकतात का ?

उत्तर – अशी काही औषधं नसतात ज्यांनी स्तनाची वाढ होईल आणि ज्याचे पूर्ण शरीरावर परिणाम होणार नाहीत. हार्मोन्सची औषधं यासाठी अजिबात घेऊ नयेत. मसाज therapies, विविध प्रकारच्या इंजेकशन चे प्रयोग यासाठी केले जातात – ज्यांचा फायदा ना होता दुष्परिणाम जास्त होतात. सर्वात खात्रीपूर्वक आणि सुरक्षित उपाय हा Augmentation with Implant आहे. ही surgery Day Care वर १-१/२ तासात पूर्ण होते.

इम्प्लांट व्यतिरिक्त Fat Grafting नावाचं procedure करता येतं ज्यात पोटावरची चरबी liposuction द्वारा काढून त्याचं प्रत्यारोपण स्तनामध्ये केलं जातं.. काही असे patient अस्तात ज्यांना कॅन्सर च्या operation नंतर ब्रेस्ट चा आकार बदलतो – अशा केसेस मध्ये sudha फॅट ग्राफ्टिंग चा वापर आम्ही करतो

(प्रश्न क्र. 4)  ब्रेस्ट sagging साठी पण इम्प्लांट वापरता येतात का ?

उत्तर – ब्रेस्ट sagging मध्ये ब्रेस्ट च्या त्वचेचं आवरण देखील ओघळलेलं असतं – त्यामुळे इथे आम्ही mastopexy किंवा ब्रेस्ट लिफ्ट चा operation करतो. काही वेळा ब्रेस्ट लिफ्ट च्या बरोबरीने इम्प्लांटचा वापर केला जातो .
नेमकी कुठली पद्धत कधी वापरावी हे या विषयात अनुभवी असलेल्या ब्रेस्ट surgeon, प्लास्टिक surgeon नी ठरवलं पाहिजे.

(प्रश्न क्र. 5) पुरूषांमध्ये काही कॉस्मेटिक ब्रेस्ट surgery केली जाते का ?

उत्तर – पुरुषांमध्ये ब्रेस्ट development झाली असेल तर त्याला आपण Gynecomastia असं म्हणतो. पुरुषांमध्ये स्तनामध्ये गाठ असेल तर प्रत्येक वेळी Gynecomastia आहे असं गृहीत धरू नये. पुरुषांमध्ये देखील ब्रेस्ट कॅन्सर होतात. फरक करण्यासाठी कधीकधी डॉक्टरांनी केलेलं परीक्षण आणि मॅमोग्राफी/ सोनोग्राफी च्या तपासण्या पुरतात तर काही वेळा core needle biopsy करावी लागू शकते. Gynecomastia आहे याची खात्री झाली कि त्याचं नेमकं कारण काय आहे हे पाह्यनासाठी रक्ताच्या तपासण्या करून hormone च्या पातळी पहिल्या जातात. काही केसेस मध्ये औषधं दिली जातात आणि त्यांचा फायदा होत नसेल तर Gynecomastia ची surgery केली जाते. Liposuction चा वापर करून स्तनाच्या चरबीचा भाग काढला जातो आणि 3 cm च्या incision मधून gland cha bhaag काढता येतो. छाती चा आकार नॉर्मल होतो.

(प्रश्न क्र. 6) कॉस्मेटिक ब्रेस्ट surgery करण्या साठी काय तयारी केली पाहिजे ?

उत्तर –  surgery कोण करतंय आणि कुठे करतंय याला महत्त्व आहे. implant surgery ही अगदी निर्जंतुकपणे पार पडणं आवश्यक आहे. सर्जन चा अनुभव काय आहे याचा अभ्यास करा. त्यांनी आधी केलेल्या शस्त्रक्रियेची उदाहरणं चित्र पहा आणि मग निर्णय घ्या. कोणतीही कॉस्मेटिक surgery करण्या अगोदर ब्रेस्ट ची mammography आणि सोनोग्राफी तपासणी केली पाहिजे. एक तरुण मुलगी माझ्याकडे तक्रार घेऊन अली कि एका बाजूचा स्तनाचा आकार लहान आहे- वाढ का होत नाही? तपासणी मध्ये आढळलं की त्या बाजूची ब्रेस्ट नॉर्मल होती. जी दुसऱ्या बाजूची ब्रेस्ट मोठी झाली होती त्यात 8 cm ची गाठ होती.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar