Saturday, October 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

मधुमेही आणि हृदयरुग्णांसह कॅन्सरच्या रुग्णांनाही वरदान ठरेल ‘हे’ मोठे फळ !  

by प्रभात वृत्तसेवा
August 26, 2022
in आरोग्य वार्ता
A A
मधुमेही आणि हृदयरुग्णांसह कॅन्सरच्या रुग्णांनाही वरदान ठरेल ‘हे’ मोठे फळ !  
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पावसाळा सुरु झाला असून रस्त्याच्या कडेला फळविक्रेत्यांकडील एक मोठे गुलाबी फळ सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हे ड्रॅगन फ्रुट असून या मोसमात ती मुबलक उपलब्ध असतात. यावेळी पावसाळ्यात बऱ्याच बाग प्रेमींच्या घरी ड्रॅगन फ्रुटची लागवड केली जाते. मात्र या रसदार फळाचे अगणित फायदे तुम्हाला माहित आहेत का? चला,  जाणून घेऊया या फळाबद्दल थोडी माहिती.

– पाहिल्यानंतर ते किवी वर्गातील वाटते. पण हे फळ कॅक्टस गटातील आहे. या फळाला पिटाया किंवा पिठाया असे म्हणतात. अमेरिकेत ही फळ वाळवंटात मिळतात.  हे फळ बाहेरुन गुलाबी रंगाचे असते आणि त्याचा गर पांढऱ्या रंगाचा असतो. हा गर चवीला फार वेगळ्या चवीचा लागत नाही. यामध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात. त्या काळ्या तिळाप्रमाणे दिसतात. त्याची चव चुरचुरीत लागते. पण फळाची चव अजिबात गोड किंवा कडू नसते. हे फळ भारतात प्रकर्षाने आता मिळू लागले आहे. हे फळ बाजारात बाराही महिने मिळते. ड्रॅगन फ्रुटमधील घटक लक्षात घेता ते आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फारच फायदेशीर आहे.

– प्रतिकारशक्ती वाढविण्याव्यतिरिक्त, या फळामुळे मधुमेह आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका देखील कमी होतो. अ‍‍ॅन्टी-ऑक्सिडंट्स, फाइबर्स आणि व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले ड्रॅगन फळ अनेक गंभीर आजारांवर फायदेशीर ठरते. आज आपण ड्रॅगन फळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात.

ड्रॅगन फ्रूटचे आरोग्यदायी फायदे 
– यात एकदम भरपूर प्रमाणात विटामीन सी असते. बरोबर कॅल्शीयम, पोटॅशियम, लोह, आणि विटामीन बी तसेच 90% पाणी असते. बाहेरुन जाड साल असली तरी आत पांढरा किंवा लाल गर असतो आणि त्यात किवी सारख्या बिया असतात. त्या खाल्यातरी चालतात.

– हे फळ म्हणजे सगळ्या रोगांवर रामबाण उपाय आहे असे म्हणतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे विटामिन सी चे भरपूर कोठार. विटामीन सी असले की रोग प्रतीकार शक्ती वाढते. म्हणजे कुठलाच रोग सहजासहजी होत नाही.

– ड्रॅगन फ्रूटने सौंदर्य ही वाढते. ह्या फळाने तुम्ही फेस मास्क बनवू शकता, केसांचा मास्क बनवू शकता. त्याने चेहऱ्यावरचे फोड, एक्ने, रुक्ष केस, केस गळणे, उन्हाने काळवंडलेली त्वचा इत्यादी हजार रोगांवर हे फळ म्हणजे रामबाण उपाय आहे. हे फळ चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करते आणि हे फळ खाण्याने तुम्ही  तरुण रसरसलेले दिसतात.

– ह्याच्यामध्ये खूप फाइबर असल्याने पोट साफ राहते. साहिजकच एकदा पोट साफ असले की 90% व्याधी नाहीशा होतात. म्हणजेच रक्त पुरवठा नीट होऊन सर्व इंद्रिये व्यवस्थित काम करतात. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तातील साखर कमी राहते. म्हणजे डायिबटीसचा धोका टळतो. कोलेस्टेरॉल कमी असल्याने हृदय विकाराचा धोका रहात नाही. तसेच ह्यात बीटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब, ह्रदय विकार सर्वावर मात करता येते.

– ह्या फळांमधील अँटीऑक्सिडंट केसांचे सौन्दर्य खुलविते. ह्यातील पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, ओमेगा-3 आणि ओमेगा-6 वाईट कोलेस्टेरॉलला वाढू देत नाही. ह्यातील लोह रक्ताचे हेमोग्लोबिन वाढवते आणि एनिमेया होऊ देत नाही.

– खरे पाहता हे आंबट फळ आहे. ह्यामुळे संधीवाताच्या वेदना कमी होतात. तसेच ह्याच्यामुळे दात व हाडे मजबूत होतात. डेंग्यू झाल्यावर आपले हाडे कमजोर होतात तसेच रोगप्रतिकार शक्ती पण अत्यंत प्रमाणात कमी होते. पण ह्या फळांचे सेवन केले तर रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्याचबरोबर हाडे पण मजबूत होतात. तेव्हा डेंग्यूची भीती कमी होईल.

– अतिशय महत्त्वाचे म्हणजे हे फळ कॅन्सरला अटकाव करते. कारण या फळामध्ये लायाकोपेन नावाचे घटक असते. ते विटामीन सी बरोबर कॅन्सरचा प्रतिबंध करते. ह्या फळाच्या सालीत पण पॉलीफेनोल आणि रसायने असतात जे काही विशिष्ट कॅन्सर पासून संरक्षण करते.

– रक्ताल्पता असलेल्या एनिमिक गर्भवतीना रक्तातील होमोग्लोबिन कमी होते आणि बाळाला कमी होमोग्लोबिनची मात्र कमी पडते. ह्या फळाच्या सेवनाने गर्भवती चे होमोग्लोबिन वाढते.

– माणसाचे जे जे मोठे शत्रू रोग आहेत त्या त्या सर्वांचा हे फळ नाश करते. रोगप्रतिकार शक्ती पासून ते कॅन्सरविरोधी शक्ती पर्यंत शक्ती निरोगी बनवते.

–  सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे, लठ्ठपणामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते. त्यामुळे ह्या फळाचे सेवन केल्यास लठ्ठपणा व चरबी कमी होण्यास मदत होते. हे फळ मधुमेह नियंत्रित करण्याचे काम करते. ड्रॅगन फळाचा वापर डेंग्यूच्या उपचारात उपयुक्त ठरू शकतो. ड्रॅगन फळाच्या बियांमध्ये फायटोकेमिकल आणि अँटीऑक्सिडेंट आणि अँटीव्हायरल गुणधर्म आहेत. यामुळे हाड आणि दात मजबूत होतात.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar