[[{“value”:”
State Prepares For MPOX । जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर सर्व देश आता सतर्क झाले आहेत. त्यातच केंद्र सरकारनं खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. तशा सूचना सर्व राज्यांना देण्यात आल्या आहेत . आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही परिस्थिती पाहता आपत्कालीन वॉर्ड तयार केले जात आहेत आणि विमानतळांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून आरोग्य यंत्रणेला सूचना State Prepares For MPOX ।
मंकीपॉक्ससंदर्भात राज्य सरकारकडून आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे…
* ज्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळं/बंदरं आहेत, तेथील आरोग्य विभागानं आंतरराष्ट्रीय/बंदरे आरोग्य अधिकारी यांच्याशी नियमित समन्वय ठेवावा.
* मंकीपॉक्ससंदर्भात विमानतळे आणि बंदरांवर सर्व्हेक्षण सुरु आहे याची खातरजमा करुन संशयित रुग्णांना विलगीकरणात उपचारासाठी आवश्यक यंत्रणा उभारावी
* मंकीपॉक्स हा सौम्य स्वरुपाचा आजार असून रुग्ण 2 ते 4 आठवड्यात बरा होतो. तथापि लहान मुलांमध्ये आणि इतर काही रुग्णांमध्ये तो गंभीर स्वरुप धारण करु शकतो. ह्या आजाराचा मृत्यूदर सर्वसाधारणपणे 3 ते 6 टक्के आहे. State Prepares For MPOX ।
* मंकीपॉक्स रुग्णाला विलगीकरण कक्षात आणि घरच्या घरी वेगळ्या खोलीत ठेवणे आवश्यक. स्वतंत्र्य व्हेंटिलेशनची व्यवस्था असावी.
रुग्णाने ट्रीपल लेयर मास्क लावणे आवश्यक
* रुग्णाच्या कातडीवरील पुरळ, फोड पूर्ण झाकलेली असावीत, त्याने लांब बाह्यांचे शर्ट आणि पॅन्ट वापरावी
* रुग्णाच्या कातडीवरील फोड/पुरळ पूर्ण बरे होत नाहीत आणि त्यावरील खपल्या गळून जात नाहीत तोपर्यंत त्याला विलगीकरणात ठेवणे आवश्यक आहे
* रुग्णाला लक्षणानुसार उपचार द्यावे, पाण्याचे प्रमाण घेईल याची दक्षता घ्यावी
* मंकीपॉक्स न होण्यासाठी काय काळजी घ्यावी यासाठी देखील मार्गदर्शक सूचना जाहीर
* आरोग्य संस्थामध्ये मंकीपाॅक्स रुग्णावर उपचार करताना पीपीई किटचा वापर करावा
हेही वाचा
जगभरात मंकीपॉक्सनं डोकं वर काढलं ! केंद्र सरकार सतर्क ; रुग्णालयांना निर्देश, विमानतळांवरही अलर्ट
The post मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारही अलर्ट मोडवर ; अयोग्य यंत्रणांना दिल्या सूचना appeared first on Dainik Prabhat.
“}]]