नवी दिल्ली – उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येकजण कूलर किंवा एसी वापरतात. पण अजूनही अनेक लोक अशे आहेत जे पैशांअभावी महागडे एसी विकत घेऊ शकत नाहीत. अशा लोकांसाठी एका कंपनीने अवघ्या 399 रुपयांमध्ये छोटा एसी लॉन्च केला आहे.
याला जगातील सर्वात लहान एसी म्हणता येईल, कारण कंपनीने याला एअर कंडिशन कूलिंग फॅन असे नाव दिले आहे. यामध्ये कूलिंगसाठी कोणत्याही प्रकारचे मशीन नाही, परंतु त्यातून बाहेर पडणारी हवा थंड करण्यासाठी बर्फाचा ट्रे देण्यात आला आहे. त्याला ब्लेडलेस विंग्स आहेत. जे 3 ते 4 फूट अंतरावर हवा फेकू शकतात.
या मिनी एसीला यूएसबी वरून वीजपुरवठा दिला जाऊ शकतो. म्हणजेच लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल, मोबाईल चार्जर, पॉवर बँक यावरूनही चालवता येते. तुम्ही ते तुमच्या फोनशी कनेक्ट करून ते सुरु करू शकता.
हा पोर्टेबल एसी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने खरेदी करता येईल. तुम्ही ते Flipkart, Amazon, Shopclues, Snapdeal, Ebay तसेच इतर वेबसाइटवरून ऑनलाइन खरेदी करू शकता.