[[{“value”:”
Sergio Gor on Tariff। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात सर्जियो गोर यांची भारतातील पुढील अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती केली. दरम्यान, सर्जियो गोर यांनी, “भारत आणि अमेरिकेतील टॅरिफवरून निर्माण झालेला तणाव काही आठवड्यात दूर होईल” असा विशवास यावेळी व्यक्त केला. तसेच त्यांनी यावेळी “दोन्ही देश टॅरिफच्या मुद्द्यावर फारसे वेगळे नाहीत’ असे म्हणत दोन्ही देशातील संबंधावर भाष्य केले.
सर्जियो गोर यांनी भारताबद्दल काय म्हटले? Sergio Gor on Tariff।
एका वृत्तसंस्थेनुसार, सर्जियो गोर यांनी, “भारत हा एक महत्त्वाचा भागीदार आहे, ज्याचे भविष्य या प्रदेशाला आकार देण्यात मोठी भूमिका बजावेल. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मजबूत नेतृत्वाखाली, मी या महत्त्वाच्या भागीदारीत अमेरिकेचे हित पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहे.” ते म्हणाले, “भारताचे भौगोलिक स्थान, आर्थिक विकास आणि लष्करी क्षमता प्रादेशिक स्थिरतेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. ते आपल्या राष्ट्रांच्या सामायिक सुरक्षा हितसंबंधांना पुढे नेण्याचा एक भाग आहे.” असे म्हणाले.
भारत आणि चीनवर लादलेल्या टॅरिफमध्ये फरक का आहे?
सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीने सर्जियो गोर यांना डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाबद्दल अनेक प्रश्न विचारले. चीन आणि भारतावर लादलेल्या टॅरिफबद्दलही प्रश्न होते. भारत आणि चीनवर वेगवेगळे शुल्क लादण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, “आम्ही आमच्या मित्रांसाठी वेगवेगळे मानके ठरवतो. आम्हाला इतर देशांपेक्षा भारताकडून जास्त अपेक्षा आहेत. अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात खोल मैत्री आहे.”
भारतातील नवीन अमेरिकेचे राजदूत ट्रम्प यांच्या जवळचे Sergio Gor on Tariff।
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर काही दिवसनपूर्वी,’व्हाइट हाऊस प्रेसिडेंशियल पर्सनल ऑफिस’चे संचालक गोर यांना भारतातील पुढील अमेरिकेचे राजदूत तसेच दक्षिण आणि मध्य आशियाई बाबींसाठी विशेष दूत म्हणून नामांकित करत आहेत. ” अशी माहिती दिली होती. सर्जियो गोर यांना त्यांचे चांगले मित्र म्हणून वर्णन करताना ट्रम्प यांनी, “जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या प्रदेशासाठी हे महत्वाचे आहे की माझ्याकडे असा कोणीतरी आहे ज्यावर मी माझा अजेंडा पूर्ण करण्यासाठी आणि अमेरिका पुन्हा महान बनविण्यात मदत करण्यासाठी पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो.” असे म्हटले होते.
The post ”भारतासोबत करार करणे फार दूर…” ; ट्रम्पचे ‘विशेष दूत’ सर्जियो गोर यांची टॅरिफवर पहिली प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat.
“}]]
