Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

भारतात 30 लाख खात्यांवर बंदी, काय आहे कारण ?

by प्रभात वृत्तसेवा
September 1, 2021
in लाईफस्टाईल
A A
व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आले ‘हे’ भन्नाट फिचर; एकदा पाहिल्यानंतर व्हिडिओ-फोटो होणार डिलीट
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

भारतात सुमारे 55 कोटी लोक व्हॉट्सऍप वापरतात. इतर कंपन्यांप्रमाणेच भारत सरकारचा नवीन आयटी कायदाही व्हॉट्सऍपवर लागू करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत सर्व सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्यात वापरकर्त्याच्या सुरक्षेचा अहवाल सरकारला सादर करावा लागतो. आता  व्हॉट्सऍपने आपला मासिक वापरकर्ता-सुरक्षा अहवाल जाहीर केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की या वर्षी जून ते जुलै दरम्यान तीन दशलक्ष किंवा ३० लाखाहून अधिक व्हॉट्सऍप खात्यांवर बंदी घातली आहे.

व्हॉट्सऍपने म्हटले आहे की प्लॅटफॉर्म सुरक्षित आणि स्पॅम मुक्त ठेवण्यासाठी ऑनलाइन स्पॅम आणि गैरवर्तनाविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. जून ते जुलै 2021 दरम्यान सुमारे 30 लाख 27 हजार खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तक्रार अधिकाऱ्यांकडे आलेल्या तक्रारींनंतर या खात्यांवर स्वयंचलित साधनाद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे.

या कालावधीत, 316 खाती ब्लॉक करण्यात आली आहेत ज्यासाठी वापरकर्त्यांनी तक्रार केली आहे आणि 73 खाती आहेत ज्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या खात्यांवर 46 दिवसांत ही कारवाई करण्यात आली आहे. या 46 दिवसांत वापरकर्त्यांकडून 594 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 316 खात्यांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव इतर खात्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.  व्हॉट्सऍप म्हणते की त्यानंतर गैरवर्तन शोधण्यासाठी स्वयंचलित साधन आहे. जर तुम्हालाही एखाद्या खात्याबद्दल तक्रार असेल तर तुम्ही [email protected] वर ई-मेल करू शकता किंवा तुम्ही ऍपमधूनच खाते ब्लॉक किंवा रिपोर्ट करू शकता.

त्याचबरोबर फेसबुकने म्हटले आहे की, नवीन आयटी कायद्यांतर्गत 33.3 दशलक्ष कन्टेन्टवर कारवाई केली आहे. ही कारवाई 16 जून ते 31 जुलै दरम्यान झाली. त्याचबरोबर इंस्टाग्रामने 2.8 दशलक्ष खात्यांवर कारवाई केली आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar