Saturday, October 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

भारतात मर्यादेपेक्षा दुप्पट जास्त साखरेचे सेवन

by
November 2, 2022
in आरोग्य वार्ता
A A
भारतात मर्यादेपेक्षा दुप्पट जास्त साखरेचे सेवन
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

2025 पर्यंत मधुमेह रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा धोका
वॉशिंग्टन :
जागतिक स्तरावरील आरोग्य तज्ञांनी ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा दुप्पट जास्त साखरेचे सेवन भारतीय करत असून 2025 पर्यंत भारतामध्ये मधुमेही रुग्णांची संख्या दुपटीपेक्षा जास्त वाढण्याचा धोका आहे. जागतिक आरोग्य संघटने नुकत्याच जाहीर केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली असून गोड खाण्याचे शौकीन असलेल्या भारतीयांनी साखरेच्या सेवनावर मर्यादा ठेवाव्यात असा इशाराही देण्यात आला आहे.

जागतिक स्तरावरील आरोग्य तज्ञांनी ठरवून दिलेल्या मर्यादाप्रमाणे व्यक्तीने दिवसात जास्तीत जास्त सहा चमचे साखर सेवन करावी असे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात भारतीयांचे साखरेचे सेवनाचे प्रमाण दररोज 12 चमचेपेक्षा जास्त आहे. भारतीयांचे साखरेचे सेवन करण्याचे प्रमाण असेच कायम राहिले किंवा त्यात वाढ झाली तर भारत एक दिवस मधुमेही रुग्णांची राजधानी म्हणून ओळखली जाईल असा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

प्रत्यक्ष साखर खाण्यापेक्षाही अप्रत्यक्ष पद्धतीने मोठ्या प्रमाणावर साखरेचे सेवन केले जाते पॅकेज फूड प्रॉडक्ट असो किंवा इतर गोड पदार्थ असोत त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणावर साखर पोटात जाते 2015 च्या आकडेवारीप्रमाणे भारतात तेव्हा सात कोटी वीस लाख मधुमेही रुग्ण होते.

2025 पर्यंत ही संख्या दुपटीपेक्षा जास्त म्हणजे 14 कोटी पर्यंत पोहोचेल अशी शक्यता आहे. अनेक वेळा मधुमेह रुग्णांची ओळखच पटत नसल्याने ही संख्या अधिक जास्त असू शकते. भारतीयांनी आगामी कालावधीमध्ये काळजीपूर्वक साखरेचे सेवन करावे आणि अप्रत्यक्षपणे पोटात जाणाऱ्या साखरेवर नियंत्रण ठेवावे असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य तज्ञांनी दिला आहे.

The post भारतात मर्यादेपेक्षा दुप्पट जास्त साखरेचे सेवन appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar