[[{“value”:”
Cancers are Increasing in Indian: जगभरात कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्याकाही वर्षात भारतातील कॅन्सर झालेल्या रुग्णांचा आकडा देखील वाढला आहे. मधूमेह, रक्तदाबासोबतच आता कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जगातील प्रत्येकी 6 मृत्यूमागे एकाचा मृत्यू कॅन्सरने होत असल्याचे समोर आले आहे.
मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण
जगभरात नागरिकांचा मृत्यू होण्यामागचे कॅन्सर हे दुसरे सर्वात मोठे कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), जगभरात प्रत्येक 6 मृत्यूमागे एका व्यक्तीचा मृत्यू हा कॅन्सरने होत आहे. यूरोप, अमेरिकेसह आता भारतातील रुग्णांचा आकडा वाढत चालल्याने तज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
5 वर्षात 71 लाख रुग्ण
रिपोर्टनुसार, भारतात वर्ष 2019 ते 2023 पर्यंत मागील 5 वर्षात तब्बल 71 लाख कॅन्सरचे रुग्ण सापडले आहेत. केवळ 2023 या वर्षातील आकडा जवळपास 15 लाख आहे. कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा देखील मोठा आहे. मागील 5 वर्षात जवळपास 40 लाख लोकांचा मृत्यू कॅन्सरमुळे झाला आहे. 2023 मध्ये कॅन्सरमुळे मृत्यू झालेला आकडा 8.28 लाख एवढा आहे.
कॅन्सर होण्यामागची प्रमुख कारणे
भारतात कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या वाढण्यामागचे प्रमुख कारण हे तंबाखू आहे. तंबाखूमुळे तोंड व घशाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. तर सिगारेटमुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. पुरुषांमध्ये प्रामुख्याने तोंड व घशाचा कॅन्सर झाल्याचे प्रमाण अधिक आहे. तर महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर व सर्व्हाइकल कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे. एकूण महिला रुग्णांपैकी जवळपास 27 टक्के प्रमाण ब्रेस्ट कॅन्सरचे आहे. याशिवाय, पोट व कोलनच्या कॅन्सरचे प्रमाण देखील अधिक आहे.
कॅन्सरचे लवकरात लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार करणे शक्य होते. यामुळे रुग्ण बरे होण्याची शक्यताही अधिक असते.
रशियाने तयार केली कॅन्सरवरील लस
दरम्यान, रशियाने या जीवघेण्या आजारावरील लस तयार केल्याचा दावा केला आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयानुसार, कॅन्सरवरील लस तयार करण्यात आली असून, नागरिकांना याचे मोफत वाटप केले जाईल. वर्ष 2025 मध्ये या लसीचे डोस देण्यात सुरूवात केली जाईल. मात्र, ही लस आजारावर कशा पद्धतीने काम करेल व किती प्रभावी ठरेल, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
The post भयानक! दरवर्षी 15 लाख भारतीयांना होतोय कॅन्सर, आजारामागचे ‘हे’ आहे प्रमुख कारण appeared first on Dainik Prabhat.
“}]]
