देशी कंपनी ‘बोट’ (boAt) ने आपले पहिले कॉलिंग स्मार्टवॉच boAt Primia लाँच केले आहे. boAt Primia सह अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ब्लूटूथ कॉलिंगसह कंपनीचे हे पहिले स्मार्टवॉच आहे. या स्मार्टवॉचमध्ये इन-बिल्ट स्पीकर असून कॉलिंगसाठी मायक्रोफोनही आहे. त्याची बॉडी धातूची हे. boAt Primia स्मार्टवॉचची विक्री Amazon आणि कंपनीच्या साइटवरून केली जात आहे. त्याची किंमत 4,999 रुपये आहे परंतु पहिल्या 1,000 ग्राहकांना हे घड्याळ 3,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळेल.
boAt Primia च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 1.39-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन 454×454 पिक्सेल आहे. थेट सूर्यप्रकाशातही डिस्प्ले सहज पाहता येईल, असा दावा केला जात आहे. घड्याळासोबत व्हॉईस असिस्टंटचाही सपोर्ट आहे.
हेल्थ फीचर्सच्या बाबतीत, boAt Primia ला रक्तातील ऑक्सिजनसाठी SPO2 सेन्सर आणि हृदय गती व्यतिरिक्त एक स्ट्रेस लेव्हल सेंसर देखील मिळतो.
घड्याळासोबत स्टेप काउंटर, बर्न झालेल्या कॅलरीज आणि अंतराची माहितीही उपलब्ध होणार आहे. स्लीप ट्रॅकिंग व्यतिरिक्त, यात बॅडमिंटन, फुटबॉल आणि सायकलिंग, योग आणि ट्रेड मिल यांचा समावेश असलेले 11 सक्रिय स्पोर्ट्स मोड आहेत.
boAt Primia boAt Crest ऍपशी कनेक्ट केले जाऊ शकते. boAt Primia वर तुम्हाला फोनवर येणाऱ्या सर्व सूचना मिळतील. फोनवर वाजवले जाणारे व्हिडिओ-संगीत इत्यादी प्ले आणि पॉज करता येतात. boAt Primia ला पाणी प्रतिरोधक म्हणून IP67 रेट केले आहे. BoAt Primia च्या बॅटरीबाबत 7 दिवसांच्या बॅकअपचा दावा करण्यात आला आहे.