Saturday, October 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

भंगारात काढलेल्या कारपासून फर्निचरची निर्मिती

by
October 11, 2022
in लाईफस्टाईल
A A
भंगारात काढलेल्या कारपासून फर्निचरची निर्मिती
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

 

जुन्या वस्तूंना परदेशात किंमत मिळते पण आपल्या देशात अनेकदा जुन्या गोष्टी भंगारात विकल्या जातात. उत्तर प्रदेशात अशाच भंगारात निघालेल्या कारपासून देखण्या फर्निचरची निर्मिती केली जाते. विशेषतः मुरादाबाद परिसरात या व्यवसाय तेजीत आहे. पितळेची भांडी, वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या मुरादाबादमध्ये आता भंगारातून अँटीक वाटाव्यात अशा वस्तूंचे उत्पादन केले जात आहे. जुन्या स्कूटरपासून टेबल, जुनी पेटी किंवा पिंप अशा जुन्या वस्तुंचे रुपडे बदलून त्यांच्यावर वेगळा साज चढवून देखण्या वस्तू तयार करण्यात येतात. या व्यवसायातील उलाढाल आता पाचशे कोटी रुपयांवर पोचलेली आहे. विशेषतः परदेशात या वस्तूंना मोठी मागणी असते.

पितळेचे परदेशी नागरिकांना आकर्षण
मुरादाबादेत भंगारातून तयार केलेल्या अशा अँटीक वाटाव्यात अशा वस्तुंना युरोपातील देशांमधून जास्त पसंती आहे. इथून पितळेच्या वस्तू व भांड्याची निर्यात 10 हजार कोटी रुपयांवर पोचली आहे. आता पितळ महागल्यामुळे अनेक ठिकाणी कारागिरांनी लोखंड व अॅल्युमिनियमपासून अँटीक दिसतील अशा वस्तूचे उत्पादन सुरू केले आहे. अशा वस्तू जर्मनी, नेदरलँड, इटली, फ्रान्स, बेल्जियम, डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे अशा देशात पाठवल्या जातात. तिथून पितळेच्या रंगाच्या आणि शेवाळी रंगाच्या अँटीक दिसणाऱ्या वस्तूंना जास्त मागणी आहे. रासायनिक प्रक्रिया करून वस्तूंना असा रंग दिला जातो. लोखंड आणि अॅल्युमिनियमवर पितळेचा रंग चढवला जातो. जो परदेशी नागरिकांना आवडतो.

भंगारातून देखण्या वस्तूंची निर्मिती करण्यासाठी भंगारवाले जुन्या स्कूटर, ड्रम, जुने दरवाजे, खिडक्या, टायर, लोखंडाच्या/लाकड्याच्या जुन्या पेट्या इत्यादी घेऊन येतात. त्यापासून अँटिक दिसणाऱ्या वस्तू तयार करणारे डझनभर कारखाने या ठिकाणी आहेत. भंगारातील वस्तू खूपच स्वस्तात मिळतात आणि त्यामध्ये देखणे परिवर्तन घडवू आणल्यावर विदेशात त्यांना घसघशीत किंमत मिळते. त्यामध्ये जुन्या टायर्सचाही खुबीने वापर केला जातो. सगळीकडे भंगारवाले टायर जाळून त्यातील तारा काढून घेतात. टायर जाळल्याने प्रदूषण होते. अँटिक वस्तूंमध्ये त्याचा वापर होतो तेव्हा ते जाळले जात नाहीत. टायरच्या तुकड्यांचाही वापर केला जातो. यापूर्वी मुरादाबाद शहरात ठिकठिकाणी भंगार गोदामात आणि बाहेर पडलेले असायचे. आता असे भंगार पडलेले दिसत नाही.

The post भंगारात काढलेल्या कारपासून फर्निचरची निर्मिती appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar